तुमच्याकडील वैष्णोदेवीचं नाणं खरं की खोट? वैष्णोदेवी मंदिरात 95 टक्के नाणी बनावट, कर्करोगाचाही धोका!
Vaishno Devi temple coins चांदीची नाणी कुठे बनतात? ते तपासण्याची जबाबदारी कोणाची असते? तसेच हा जो गैरप्रकार झाला याला जबाबदार कोण
95 percent of the coins in the Vaishno Devi temple are fake also a risk of cancer : उत्तरेतील चारधामयात्रे दरम्यान भाविक हे वैष्णोदेवीला देखील आवर्जून जातात. मात्र सध्या ह मंदीर एका वेगळ्याच प्रकरणामुळे चर्चेत आलं आहे. हे प्रकरण म्हणजे वैष्णोदेवी मंदीरात देवीला वाहण्यात येणारे चांदीचे नाण्यांमध्य केवळ 5 ते 6 टक्के चांदी वापरली गेली आहे. एवढं नाही तर या नाण्यांमध्ये वापरलेला हा धातू कॅन्सरला कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे की,देवीला वाहिले जात असलेली ही चांदीची नाणी कुठे बनतात? ते तपासण्याची जबाबदारी कोणाची असते? तसेच हा जो गैरप्रकार झाला याला जबाबदार कोण जाणून घेऊ सविस्तर…
17 वर्षापासूनचे अनैतिक संबंध; 36 लाखांची वसूली, घरात घुसून केला खून
वैष्णोदेवी प्रति असलेल्या भाविकांच्या श्रद्धेमुळे त्या ठिकाणी ही परंपरा आहे की देवीला चांदीचे नाणे वाहिले जातात. मात्र नुकतेच माता वैष्णोदेवी श्राईन बोर्डने पहिल्यांदाच 20 टन चांदी टाकसाळमध्ये पाठवली होती. मात्र या ठिकाणी जेव्हा त्याची तपासणी झाली त्यामध्ये धक्कादायक सत्य समोर आलं त्या नाण्यांमध्ये केवळ पाच ते सहा टक्केच चांदी असल्याच आढळून आलं आहे. त्याचबरोबर केवळ चांदीचा गैरव्यवहार नाही तर या नाण्यांमध्ये वापरण्यात आलेलं लोखंड आणि कॅडमियमसारखे धातू आढळून आले जे आरोग्याला हानिकारक असून याने थेट कॅन्सरला निमंत्रण मिळू शकतं.
ईद 2027 साठी सलमान खानचा मोठा धमाका; दिग्दर्शक वंशी पैदीपल्लींसोबत पुढच्या ॲक्शनपटाची घोषणा
अद्याप या गैरव्यवहारावर श्राईन बोर्डने कोणतेही उत्तर दिले नाही. या बोर्डचे प्रमुख जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा हे आहेत. माता वैष्णोदेवी ही देशातील एक मोठं तीर्थस्थान आहे. बोर्डच्या वेबसाईट नुसार यावर्षी या ठिकाणी 27.50 लाखाहून अधिक भाविकांनी दर्शन घेतलं आहे.या ठिकाणी भाविक आपल्या यथाशक्तीनुसार दान करतात. त्यामध्ये ही नाणी देखील देवीला अर्पण केली जातात. तसेच देवीला अर्पण केलेलं हे दान थेट देवीपर्यंत पोहचतं असं भाविकांचं माननं आहे.
आता पाहूयात देवीला वाहिल्या जाणाऱ्या या चांदीच्या नाण्यांबाबत वैष्णोदेवी मंदिरामध्ये व्हायला जाणाऱ्या या नाण्यांच्या व्यवस्था श्राईन बोर्ड करतं हे बोर्ड 1986 पासून काम करतं. नाण्यांसोबत यात्रा, सुरक्षा आणि दान त्याची व्यवस्था पाहतं. त्यामुळे मंदिरामध्ये दानपेटी पासून मोठ्या दानांपर्यंत सगळ्या गोष्टींचा रेकॉर्ड सुरक्षित ठेवणे हे देखील जबाबदारी असते. त्यातच पहिल्यांदाच 20 टणांची नाणी ही श्राईन बोर्डने टाकसाळ मध्ये पाठवले होते.
आता पाहूयात हे नाणे नेमके येतात कुठून?तर भाविक हे नाणे देवीला वाहण्यासाठी कटरा या ठिकाणी घेतात.काही वेळा मंदिर परिसरातील दुकानांमधून देखील खरेदी केले जातात. या सर्व चांदीचे तपासणी सरकारी टाकसाळ करतं. तेच या धातूची शुद्धता तपासतात
आणि याच प्रक्रियेमध्ये आहे हा प्रकार उघडकीस आल आहे.
प्रकाशक प्रकाश आंबींना सुरक्षा देण्यात यावी, विजय वडेट्टीवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
कारण ग्राहकांच्या सुरक्षेचे BIS नियम , हॉलमार्क जे शुद्धता साठी ओळखले जाते. मात्र इतके दिवस हे काहीच पाहिलं गेलं नाही का ?हे नाणे कुठे बनत होते? ग्राहकांना चांदीच्या भावात विकले जाणारे नाणी खरच चांदीचे होते का? हा प्रकार मंदिराच्या आत होत होता की बाहेर बाजारात असे एक ना अनेक प्रश्न सध्या उपस्थित झाले आहेत. त्यामुळे या गैरप्रकाराला जबाबदार कोण?
SBI महाराष्ट्राचे मुख्यालय आता पुण्यात; वाढती आर्थिक ताकद पाहता बँकेचा मोठा निर्णय
या प्रकारणाची जबाबदारी अनेकांवर आहे ज्यमध्ये श्राईन बोर्डची जबाबदारी आहे की, दानात येणाऱ्या नाण्यांवर लक्ष ठेवणे, स्थानिक प्रशासनाची जबाबदारी ती म्हणजे बाजारात अशा प्रकारची बनावट नाणी येत आहेत तर ती कुठूनय येत आहेत? त कुठे बनवली जात आहेत? त्याचा तपास करून कारवाई करणे . तसेच असे गैरप्रकार परत होऊ नये यासाठी पावलं उचलणे, जसे की, प्रत्येक नाण्यावर हॉलमार्क असणे अनिवार्य करणे. जे सोने-चांदी सारख्या धातूंची शुद्धतेचं प्रमाण असतं. वेळोवेळी ही नाणी तपासणे, भाविकांना या गैरप्रकारबाबत जागरूक करणे. याबाबत ऑनलाईन देखील माहिती देणे. आणि महत्त्वाचं म्हणजे असे गैरप्रकार करणाऱ्यांना कडक शिक्षा करणे.
आता पाहूयात या बनावट नाण्यांमध्ये वापरले गेलेले कॅडमियम किती घातक आहे? त्याचबरोबर केवळ चांदीचा गैरव्यवहार नाही तर या नाण्यांमध्ये वापरण्यात आलेलं लोखंड आणि कॅडमियमसारखे धातू आढळून आले. कॅडमियम हा एक स्वस्त धातू आहे. जो दिसायला चांदीप्रमाणे असतो. त्यामुळे फसवणूक होणे अगदी साहजिक आहे. मात्र हा धातू आरोग्यासाठी हानीकारक आहे. हा धातू जाळल्यानंतर त्यातून एक विषारी वायू बाहेर पडतो. जो फुफ्फुसांसाठी हानिकारक आहे.तो किडनीवरही दुष्परिणाम करतो तसेच यामुळे कॅन्सरचा धोका देखील निर्माण होऊ शकतो.त्यामुळे जेव्हा टाकसाळीतील कर्मचाऱ्यांनी ही नाणी वितळवली त्यावेळी त्यांना खबरदारी घ्यावी लागली. त्यामुळे भाविकांची श्रद्धा त्यांचं आर्थिक नुकसान ,फसवणूक तसेच बनावट नाण्यांमुळे त्यांच्या आरोग्य निर्माण होणारा धोका या पार्श्वभूमीवर या गैरप्रकाराची चौकशी होऊन श्राईन बोर्ड आणि सरकारने दोषींवर तात्काल कारवाई करणे गरजेचे आहे.