मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवलेल्या महिला डॉक्टरने सरकारी नोकरीला लाथ मारून सोडले राज्य

नितीश कुमार यांनी या जाहीर कार्यक्रमात महिला डॉक्टर नुसरत परवीन यांचा बुरखा हटवल्याची घटना; बिहार सोडून थेट कोलकाता गाठलं.

  • Written By: Published:
Untitled Design (116)

Bihar CM Nitish Kumar Hijab Controversy : बिहारच्या पाटणा येथे एका नियुक्तीपत्र वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार(CM Nitish Kumar) यांनी या जाहीर कार्यक्रमात महिला डॉक्टर नुसरत परवीन(Dr. Nusrat Parveen) यांचा बुरखा हटवल्याची घटना घडली होती. बुरखा हटवल्याचं हे प्रकरण आता एक गंभीर वळणावर येऊन पोहोचलंय. या घटनेमुळे डॉक्टर नुसरत यांना मानसिक धक्का बसला असून, त्यांनी बिहार(Bihar) सोडून थेट कोलकाता(Kolkata) गाठलं आहे. विशेष म्हणजे ज्या सरकारी नोकरीचं(Government Job) स्वप्न त्यांनी पाहिलं होतं, तीच सरकारी नोकरी जॉईन करणासही त्यांनी साफ नकार दिला आहे.

15 डिसेंबर रोजी पाटणा येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. डॉक्टर नुसरत यांच्यासोबत घडलेल्या घटनेनंतर त्यांनी कोलकाता येथील आपल्या घरी जाण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. मी शाळा आणि कॉलेजमध्ये नेहमी बुरखा घालूनच शिक्षण घेतलं. माझ्यासाठी बुरखा हा कपडा नसून माझ्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. त्या कार्यक्रमात अनेक लोक उपस्थित होते, या घटनेवर काही जण हसत होते. एक मुलगी म्हणून मला ते अपमानास्पद वाटलं. मी खूप मेहनतीने इथवर पोहोचले होते. आई-वडिलांना मदत करण्याचे माझे स्वप्न होते, पण आता बिहारला परत जाण्याची माझ्यात हिंमत उरली नाहीये, अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

ब्रेकिंग : अजितदादांचे ‘रमी किंग’ कोकाटेंविरोधात वॉरंट जारी; अटक करण्याचे कोर्टाचे आदेश

दरम्यान डॉक्टर नुसरत यांच्या कुटुंबीयांनी त्यांना भरपूर समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या अजूनही घडलेल्या घटनेच्या मानसिक आघातामध्ये आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या या कृत्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका केली जात असून संबंधित महिला डॉक्टरने राज्य सोडल्याने नितीश कुमार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

follow us