नो बॉल देणं अंपायरच्या बेतलं जीवावर; त्याने थेट मैदानातच चाकू…

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 03T161414.405

Orissa Umpire Murder :  भारतामध्ये क्रिकेटला अनन्य साधारण महत्व आहे. क्रिकेट पाहण्यासाठी लोक अगदी जेवण सुद्धा विसरुन जातात. काही जण तर ऑफिसला देखील सुट्टी घेतात. भारतामध्ये क्रिकेटला लोक दुसरा धर्म मानतात. पण काही वेळा या क्रिकेटवरुन वाद देखील पहायला मिळतात. दोन संघामध्ये बऱ्याचदा क्रिकेट खेळताना मारामारी झाल्याचे देखील आपण पाहिले आहे. पण यावेळेस एक मोठी घटना क्रिकेटच्या सामन्याच्या वेळेस घडली आहे.

क्रिकेटच्या सामन्यावेळी अंपायरने चुकीचा निर्णय दिल्याने एका व्यक्तीने रागातून थेट अंपायवर चाकुने सपासप वार केले आहेत. यानंतर उपचारादरम्यान त्या अंपायरचा मृत्यू झाला आहे. ही घटना ओडिसा राज्यातील आहे. अंपायरने नो बॉल दिल्याने एका तरुणाने थेट चाकुने त्याच्यावर वार केला आहे. यानंतर क्रिकेटच्या मैदानावर एकच खळबळ उडाली आहे.

अभिनेत्री दिपाली सय्यद यांचे पाकिस्तानशी संबंध? शिंदेंनी केला आरोप

ही घटना कटकमधील महिशिलंदा या गावातील आहे. लकी राऊत असे मृत तरुणाचे नाव आहे. तर स्मृती रंजन असे या आरोपीचे नाव आहे. सदर आरोपीला गावकऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. महिसलंदा येथे ही स्पर्धा सुरु होती. ब्रह्मपूर आणि शंकरपूर या दोन संघामध्ये सामना सुरु होता. ब्रह्मपूर संघाच्या विरोधात पंचांनी चुकीचा निर्णय दिल्याने हा वाद सुरु झाला. या निर्णयानंतर स्मृती रंजन या तरुणाला संताप अनावर झाला. त्याने अंपायरसोबत वाद घालायला सुरुवात केली.

अभिनेत्री दिपाली सय्यद यांचे पाकिस्तानशी संबंध? शिंदेंनी केला आरोप

यानंतर त्याने आपल्या जवळील चाकू काढला व अंपायरवर सपासप वार केले. चाकूच्या हल्ल्यामध्ये अंपायर गंभीर जखमी झाला. यानंतर अंपायरला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

Tags

follow us