Adani Group: एका दिवसात अदानी समूहाचे ‘इतक्या’ कोटींचे नुकसान, अदानींच्या कंपन्यांची अवस्था बिकट

  • Written By: Published:
Adani Group: एका दिवसात अदानी समूहाचे ‘इतक्या’ कोटींचे नुकसान, अदानींच्या कंपन्यांची अवस्था बिकट

मुंबई : भारतातील दिग्गज उद्योगपती आणि जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलेले गौतम अदानी (Gautam Adani) यांना एका दिवसात हजारो कोटी रुपयांचा फटका बसला आहे. अदानी समुहामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस फारसा चांगला ठरला नाही. अदानी समूहाच्या कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये (market cap)आज तब्बल ८ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. कालच्या पातळीच्या तुलनेत आज झालेली घसरण ही 51,000 कोटींहून अधिक अधिक आहे. 14 फेब्रुवारीनंतरची ही सर्वात मोठी एकदिवसीय घसरण आहे.

आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळख असलेले गौतम अदानी यांची नव्या वर्षाची सुरुवात चांगली झाली नाही. गेल्या काही दिवसात मोदी सरकारच्या मदतीने अदानी समुहाने मोठी प्रगती केली आहे. मात्र, अमेरिकी रिसर्च संस्था हिंडेनबर्गचा अहवाल जाहीर झाल्यापासून अदानी यांच्या अडचणीत  कायम वाढ होत आहे. हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहावरचा अहवाल समोर आणल्यानंतर अदानी समूहाच्या मार्केट कॅपमध्ये सातत्याने घट होत आहे. आज एका एका झटक्यात अदानी सुमहाच्या कंपन्यांच्या संपत्तीमध्ये कमालीची घट झाली आहे. आज झालेली घट ही तब्बल ८ लाख कोटी रुपयांची कोटी रुपयांची आहे. कालच्या तुलनेत ही घट ५१ हजार कोटीहून अधिक आहे.

तज्ज्ञांच्या मते, गौतम अदानी यांनी गमावलेल्या संपत्तीत पाकिस्तान सुमारे ८ महिने घरात बसून खाऊ शकतो. आर्थिक संकटातून जात असलेल्या पाकिस्तानच्या 8 महिन्यांच्या आयातीसाठी ही रक्कम पुरेशी आहे. एवढेच नाही तर फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या यादीनुसार, गौतम अदानी यांची संपत्ती फक्त 46.7 अब्ज डॉलर आहे. आज झालेल्या घसरणीमुळे आता अदानी हे जगातील श्रीमंतांच्या यादीत 26 व्या क्रमांकावर पोहोचले आहेत.

Radhakrushna Vikhe: महसूल परिषदेतून विखेंनी साधले शक्तिप्रदर्शन 

गुंतवणूकदारांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न
गौतम अदानी यांनी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी खूप प्रयत्न केले जात आहेत. परंतु त्याचा गुंतवणूकदारांवर काहीही परिणाम होतांना दिसत नाही. गुंतवणूकदारांना आश्वस्त करण्याच्या प्रयत्नात अदानी पोर्ट्सने सोमवारी एसबीआय म्युच्युअल फंडाला 1500 कोटी रुपये दिले आहेत. मार्चमध्ये अदानी पोर्ट व्यावसायिक पेपरच्या बदल्यात एसबीआय म्युच्युअल फंडला आणखी 1000 कोटी रुपये देण्याची तयारी करत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube