राष्ट्रपतींनंतर PM मोदींनी घेतली वरिष्ठ नेत्यांची भेट; भाजप अध्यक्षांपासून ते मंत्रिमंडळापर्यंत काहीतरी मोठे घडणार?

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांची भेट घेतली होती तर आज बुधवारी भाजच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याने देशाच्या राजकारणात अनेक चर्चांना उधान आले आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार भाजपमध्ये (BJP) लवकरच मोठा बदल होणार आहे. पुढील काही दिवसात भाजपकडून नवीन पक्षाध्यक्षाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे पंतप्रधान मोदी (PM Modi) आणि राष्ट्रपती यांची भेट औपचारिक होती अशी माहिती भाजपकडून देण्यात आली आहे. मात्र या भेटीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) ताज्या निर्णयावर चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभेने मंजूर केलेल्या विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी राज्यपाल आणि राष्ट्रपतींना तीन महिन्यांची मर्यादा निश्चित करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे मात्र या निर्णयाविरोधात सरकार आता पुनर्विचार याचिका दाखल करण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे.
तर दुसरीकडे बिहार, तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रीमंडाळात बदल होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या भेटीदरम्यान यावर देखील चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
नवीन अध्यक्षाची घोषणा
बुधवारी, पंतप्रधान मोदींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि पक्षाचे संघटन सरचिटणीस बीएल संतोष यांची भेट घेतली. तर दुसरीकडे मंगळवारी शाह आणि सिंग यांनी पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतल्यानंतर ही भेट झाल्याने भाजप लवकरच नवीन अध्यक्षाची घोषणा करु शकतो अशी माहिती समोर येत आहे.
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी अमित शहा आणि नड्डा यांच्यातील दुसरी बैठक पक्षाध्यक्ष निवडीच्या दिशेने पुढचे पाऊल मानली जात आहे.जेपी नड्डा यांना 2020 मध्ये पक्षाचे अध्यक्ष बनवण्यात आले होते आणि 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीमुळे त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती.
मोठी बातमी! कुणाल कामराला दिलासा; मुंबई उच्च न्यायालयाने दिली अटकेला स्थगिती
भाजप अध्यक्षाची निवड कशी होते?
पक्षाच्या घटनेनुसार, अध्यक्षांचा कार्यकाळ सलग दोन वेळा 3 वर्षांचा असू शकतो आणि तो राष्ट्रीय परिषद, राज्य परिषदांच्या सदस्यांचा समावेश असलेल्या निवडणूक मंडळाद्वारे निवडला जातो. 50 टक्के राज्यांनी त्यांचे राज्याध्यक्ष निवडल्यानंतर, राष्ट्रीय अध्यक्ष निवडले जातात. आतापर्यंत सुमारे 14 राज्यांमध्ये नवीन प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे.