कर्नाटकातही एक अजित पवार, वर्षाअखेरीस चित्र बदलणार? एच. डी. कुमारस्वामींच्या दाव्याने खळबळ…

कर्नाटकातही एक अजित पवार, वर्षाअखेरीस चित्र बदलणार? एच. डी. कुमारस्वामींच्या दाव्याने खळबळ…

महाराष्ट्रासारखीच कर्नाटकातही तशीच परिस्थिती तयार होत असून कर्नाटकातही एक अजित पवार तयार होत असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री जेडीएस नेता एचडी कुमारस्वामी यांनी केला आहे. वर्षाच्या अखेरीस चित्र बदलणार असल्याचा दावा एच.डी. कुमारस्वामी यांनी केला आहे. या दाव्यामुळे कर्नाटकात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवेसेनेत असताना बंड केलं. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे अजित पवार यांनीही बंड करत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलीयं. त्यावरुन आता कर्नाटकातही अशीच परिस्थिती तयार होत असल्याचं भाकीत माजी मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

एकंदरीत महाराष्ट्रात घडत असलेल्या राजकीय भूकंपानंतर आता कर्नाटकातही लवकरच काँग्रेस सरकार पायउतार होणार आहे, मात्र, कर्नाटकातला अजित पवार कोण असेल? हे मी आत्ता सांगणार नाही. परंतू
लवकरच सरकार कोसळणार असल्याचं विधान कुमारस्वामी यांनी केलं आहे.

मतदार झोपेत असताना डोक्यात दगड घालण्यासारखंचच काम, बीआरएस नेत्याची सडकून टीका…

यावेळी बोलताना कुमारस्वामी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल चढवला आहे. ते म्हणाले काँग्रेसच्या वृत्तीमुळे राज्यात महायुती होणं शक्य नाही. भाजपने घोषणा देत म्हटलंय की डी.के. कुमार यांच्यासोबत काँग्रेसने धोकेबाजी केली होती. त्यामुळे आता 2018 च्या युतीनंतरही काय उपयोग झाला नसल्याचं कुमारस्वामींनी स्पष्ट केलंय.

जयंत पाटलांचा थेट अजित पवारांना झटका; शपथ घेणाऱ्या नऊ आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई

कर्नाटकात सिद्धरामय्या सरकार स्थापन झाल्यानंतर सिद्धरामय्या यांच्यासह डी. के. शिवकुमार यांच्या नावाचीही चर्चा सुरु आहे. कोणत्याही परिस्थितीत शिवकुमार यांना मुख्यमंत्रिपदी विराजमान व्हायचं आहे, मात्र, काँग्रेसच्या महाशक्तीपुढे त्यांचे सर्व प्रयत्न अयशस्वी होत असल्याचं दिसून येत आहे. शिवकुमार उपमुख्यमंत्रीदेखील होण्यास तयार आहेत.

अजित पवारांचंही नेतृत्व मान्य होतं पण.., राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अंकुश काकडेंचं मोठं विधान

कर्नाटकात मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या रेसमध्ये इतरही अनेक मुख्यमंत्री आहेत. काँग्रेस सरकार सुरुवातीपासूनच अडचणीत आहे. अशातच विरोधी पक्ष बंगळूरुमध्ये होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीत सहभागी होणार नाहीत. कारण विरोधी पक्षांच्या नेत्यांना बैठकीसाठी आमंत्रित केलेलं नाही.

कर्नाटक सरकारमध्ये बंड करणारे नेते सक्रिय असून ते नेते पैसे घेऊन पाठिंबा देणार आहेत. राज्य सरकारच्या सर्वच विभागांमध्ये भ्रष्टाचार सुरु आहे. परिवहन आणि महसूल विभागातही बदली करणारी टोळी सक्रिय असल्याचे आरोप कुमारस्वामी यांनी केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube