चार राज्यात 22 सभा अन् रोड शो; स्टार प्रचारक फडणवीस भाजपसाठी ठरणार ‘लकी’ चार्म?

  • Written By: Published:
चार राज्यात 22 सभा अन् रोड शो; स्टार प्रचारक फडणवीस भाजपसाठी ठरणार ‘लकी’ चार्म?

Devendra Fadnavis Key Role In Four State Assembly Election :  लोकसभेपूर्वी देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका (Assembly Election) पार पडत असून, या सर्वांकडे मिनी लोकसभेची तयारी म्हणून बघितले जात आहे. भाजपनं मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणातही कमळ फुलेल असा विश्वास व्यक्त केला असून, या चारही राज्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार प्रचार केला आहे. स्टार प्रचारक म्हणून फडणवीसांचे नाव या चारही राज्यातील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आघाडीवर होते. प्रचारादरम्यान फडणवीसांनी चार राज्यात तब्बल 22 सभा घेतल्या असून, या निवडणुकांमध्ये ते भाजपसाठी ‘लकी’ चार्म ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Animal Event: ‘मुंबईचे दिवस गेले, हैदराबादला या! तेलंगणाच्या नेत्याची रणबीर कपूरला ऑफर

राज्यप्रमाणे परराज्यातही ठरणार चाणक्य

फडणवीसांना राज्यातील राजकारणात चाणक्य म्हणून ओळखले जाते. यापूर्वी पार पडलेल्या अनेक निवडणुकामध्ये त्यांनी आखलेली रणनीती भाजपच्या फळास आली असून, याचा फायदा पक्षाला झालेला आहे. त्यामुळे राज्यात ज्या पद्धतीने फडणवीस विजयासाठी रणनीती आखतात आणि संवाद साधतात तीच पद्धत त्यांनी मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि छत्तीसगड येथील प्रचारादरम्यान अवलंबल्याचे दिसून आले. त्यामुळे राज्याप्रमाणे परराज्यातही फडणवीस विजयाचे चाणक्य ठरणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Video : CM शिंदे तेलंगणात कोणत्या भाषेत बोलणार?; उद्धव ठाकरेंना चिंता अन् उत्सुकता

रोड शो अन् झंझावती दौरे

चार राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांसाठी फडणवीसांचे नाव स्टार उमेदवारांच्या स्टार प्रचारक यादीत टाकण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील उमेदवारांसाठी रोड शो आणि प्रचार केला. काही दिवसांपूर्वी बिहार, गोव्यात पार पडलेल्या निवडणुकांमध्ये फडणवीसांवर प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. ही जबाबदारी त्यांनी अचूक निभावली होती. या दोन्ही ठिकाणी भाजपची सत्ता आली होती. परंतु, नितीश कुमार यांनी त्यांच्या भूमिकेत ऐनवेळी बदल केला आणि राजदसोबत युती करत सत्ता स्थापन केली. पण गोव्यात आजही भाजपची सत्ता आहे.

कसे होते फडणवीसांचे झंझावाती दौरे

देशातील चार राज्यात पार पडणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांसाठी फडणवीसांनी झंझावाती दौरे केले. यात त्यांनी मध्यप्रदेश 18 सप्टेंबर, 10 आणि 15 नोव्हेंबर दरम्यान दौरे केले. आतापर्यंत फडणवीसांनी तीन दौरे केले आहेत. यात प्रामुख्याने धार, इंदोर, महू, बुरहानपूर, पांढुर्णा, सौंसर या ठिकाणी फडणवीसांच्या 8 सभा आणि रोड शो पार पडले.

Online Payments : 2 हजारांपेक्षा अधिक रक्कम पाठवताना 4 तासांची प्रतिक्षा?

मध्यप्रदेशसह फडणवीसांनी छत्तीसगडमध्येही जोरदार प्रचार केला. यात त्यांनी 30 ऑक्टोबरला रोजी धमतरी, रायपूर येथे 2 सभा आणि रोड शो केले. याशिवाय राजस्थानमध्ये फडणवीसांचे दोन दौऱे झाले यात त्यांनी केसरी, नासिराबाद, किशनगड, अजमेर उत्तर, सांगानेर, आदर्शनगर येथे 7 सभा घेतल्या. तर, फडणवीस 21 नोव्हेंबर आणि 28 नोव्हेंबरदरम्यान फडणवीसांच्या तेलंगणातील डोमलगौडा, हैदराबाद, नरसामपेट, देवलकोंडा, पालाकुर्ती येथे 5 सभांसह रोड शो पार पडले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube