Tirupati Balaji Prasad : ज्यांनी प्रसाद ग्रहण केला, त्यांनी 9 दिवस…; बागेश्वर बाबांनी सांगितला शुद्धीकरणाचा उपाय
Dhirendra Krishna Shastri on Tirupati Balaji Prasad : तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादात (Tirupati Balaji Prasad) प्राण्यांची चरबी वापरल्याने राजकारण चांगलेच तापले आहे. या तिरुपती लाडू वादावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. दरम्यान, आता प्रसादात जनावरांची चरबी सापडल्याच्या वादावर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Pandit Dhirendra Krishna Shastri) यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ज्या हिंदूंनी तिरुपती बालाजीचा प्रसाद घेतला असेल त्यांनी शुद्धीकरणासाठी नेमकं काय करावं, हे देखील बागेश्वर बाबांनी सांगितलं.
फाशीची पद्धत चुकलीयं, गोळी मारुन फाशी देण्याची पद्धत; वडेट्टीवारांनी मुख्यमंत्री शिंदेंना घेरलं
ज्यांनी तिरुपती बालाजीचा प्रसाद ग्रहण केला असेल त्यांनी नऊ दिवस प्रायश्चित करावं, जेणेकरून शुद्धीकरणाची प्रक्रिया पूर्ण होईल, असा सल्ला धीरेंद्र शास्त्री यांनी दिला आहे.
ते म्हणाले, धर्माला विरोध करणाऱ्यांच्या विरोधात आताच आवाज उठवला नाही तर भविष्यात प्रत्येकाच्या घरी माशाचं तेल ताटात वाढण्यासापासून कोणीही रोखू शकणार नाही. जनावरांची चरबी आणि माशांचे तेल घरोघरी पोहोचण्यापासून स्वत:चे रक्षण करायचे असेल तर रील्स अन् व्हिडिओजच्या दुनियेतून बाहेर पडावे लागेल. जर सनातन धर्माच्या विरोधात रचल्या जाणाऱ्या षडयंत्र आणि फसवणुकीचा आपण विरोध केला नाही, तर आपण धर्मविरोधी कारस्थानांना बळी पडत राहू, असेही बागेश्वर बाबा म्हणाले.
Haryana Vidhansabha : कॉंग्रेसच्या डीएनएमध्येच आरक्षण विरोध…; PM मोदींचे जोरदार टीकास्त्र
तर कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. लोक अशा प्रकारे सनातन धर्माशी असे खेळ करत असतील तर ते अत्यंत लाजिरवाणे आहे. जेव्हा मी स्वत: ही पाहिली त्यानंतर मला जेवण गेलं नाही. मी पण तिथला प्रसाद खाल्ला आहे आणि मला नाही माहिती मी कुठली चरबी खाल्ली. या घटनेने मी खूप अस्वस्थ झालेय. असे कृत्य करणाऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असं विजयवर्गीय यांनी म्हटलं.
नेमकं प्रकरण काय?
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी वापरली जाते, असा गंभीर आरोप केला होता. त्यांच्या या आरोपानंतर मोठी खळबळ उडाली होती. वास्तविक, तिरुमला तिरुपती मंदिर जगभर प्रसिद्ध आहे. तसेच त्या ठिकाणी असलेले प्रसादाचे लाडूही अत्यंत पवित्र मानले जातात. मात्र, मुख्यमंत्री नायडू यांच्या आरोपानंतर आंध्र प्रदेशात राजकारण तापले.
अहवालातून काय समोर आलं?
दरम्यान, तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडूमध्ये प्राण्यांची चरबी वापरली जात असल्याच्या आरोपानंतर आता लॅब चाचणीचा अहवाल समोर आला आहे. या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
तिरुपती मंदिरात भाविकांना प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी आणि माशाच्या तेलाचे अंश सापडले आहेत, असे प्रयोगशाळेच्या अहवालातून समोर आले आहे.