Bharat Bandh : आज ‘भारत बंद’ची हाक; वाचा, काय राहणार सुरु अन् काय राहणार बंद?
Bharat Bandh : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) एससी आणि एसटी प्रवर्गाच्या आरक्षणात क्रिमीलेअरबाबतचा निर्णय दिलायं. या निर्णयाविरोधात देशभरात भारत बंदची हाक देण्यात आलीयं. आरक्षण बचाव संघर्ष समितीसह देशातील दलित संघटनांकडून आज 21 ऑगस्ट रोजी भारत बंदची हाक देण्यात आलीयं. या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात कोणतीही अनुसूचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलायं.
Government Schemes : ‘कृषी कर्ज मित्र’ योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल? वाचा सविस्तर…
अद्याप केंद्र सरकारकडून भारत बंदसंदर्भात कोणत्याही प्रकारचे अधिसूचना जारी केलेली नाही. मात्र, बंददरम्यान, सार्वजनिक परिवहन सेवा बंद असू शकतता, तर काही ठिकाणी खाजगी कार्यालये बंद राहण्याची शक्यता आहे. रुग्णालये, रुग्णवाहिका अशा आपत्तकालीन सेवा सुरु राहणार असून बॅंक आणि सरकारी कार्यालये बंद ठेवण्याबाबत अद्याप कोणतेही आदेश हाती आलेले नाहीत. त्यामुळे बॅंका आणि कार्यालये सुरुच राहणार असल्याची शक्यता आहे.
चिमुड्यांवरील अत्याचारानंतर बदलापूरकर मागे हटेना; ‘फाशीचा फंदा’ दाखवत महाजनांसमोर आंदोलन
एससी-एसटी आरक्षणातील क्रिमीलेयर बनवण्याची परवानगी राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाने दिलीयं. ज्या लाभार्थ्याला खरी आरक्षणाची गरज आहे, त्याला प्राथमिकता मिळावी, त्यासाठी उपवर्गीकरण बनवण्याबाबत न्यायालयाकडून सांगण्यात आलंय. या निर्णयाविरोधात मोठा वाद सुरु असून त्याविरोधात संघटनांकडून उद्या भारत बंदची हाक देण्यात आलीयं. सर्वोच्च न्यायालयाने एससी आणि एसटीमध्ये उपवर्गीकरणाला मान्यता दिलीयं, वर्गीकरणाचे अधिकार राज्य सरकारांना देण्यात आले आहेत. तसेच एससी एसटीमधील अतिमागास जातींना आरक्षणाचा फायदा मिळाला पाहिजे. या निर्णयावरुन देशभरात एससी आणि एसटी समुदायात रोष आहे.
दरम्यान, वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी या बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या कक्षा ओलांडून हा निर्णय दिल्याचे मत प्रकाश आंबेडकरांनी म्हटलयं. तर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनीही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विरोध केला आहे. अनेक केंद्रीय मंत्री आणि एनडीएमधील घटक पक्ष या निर्णयाच्या विरोधात आहेत. सोशल मीडियावर देखील भारत बंद ट्रेंड करत आहे.