घोडचूक झाली! आंदोलकांवर लाठीचार्ज करताना पोलिसाने डेप्युटी कलेक्टरलाच ठोकलं; व्हिडिओ
During Lathi Charge SDM Also Hit By Lathi In Patna : एकीकडे राज्यात बदलापूर (Badlapur Rape Case) येथे दोन चिमुरड्यांवर अत्याचाराचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी जमलेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. या सर्वामध्ये सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात पोलीसाने चक्क उपजिल्हाधिकाऱ्यांनाच लाठीचा प्रसाद दिला आहे.
मोठी बातमी : लॅटरल एंट्रीवरून मोदी सरकार बॅकफुटवर; विरोधानंतर थेट भरतीच रद्द
नेमकं काय घडलं?
अनुसूचित जाती-जमाती आरक्षणात क्रिमी लेयर आणि कोटा लागू करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्णयाविरोधात दलित-आदिवासी संघटनांनी बुधवारी म्हणजेच, 21 ऑगस्ट रोजी 14 तासांसाठी भारत बंदची हाक दिली होती. या भारत बंद दरम्यान बिहारच्या पाटणा येथे हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं.
पाटणामध्ये पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला, त्यावेळी उपजिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस व इतर पोलीस फोर्स रस्त्यावर उतरल्या होत्या. मात्र, यावेळी, पोलीस फोर्समधील एका पोलिसाने चक्क उपजिल्हाधिकाऱ्यावरच लाठीचार्ज केला. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
बदलापूर स्थानकावरील आंदोलन व्यवस्थित नियोजन करूनच; पोलिसांनी टिपलेल्या गोष्टींनी संशय बळावला
साहेब चुकून झाले
या घटनेनंतर घटनास्थळी पोलिस आणि प्रशासन यांच्यात काही काळ अस्वस्थता निर्माण झाली होती. ज्यावेळी संबंधित पोलसाने उपजिल्हाधिकाऱ्यालाच चोप दिला. त्यावेळी एका कर्मचाऱ्याने ते आंदोलक नव्हे तर, उपजिल्हाधिकारी आहेत असे सांगितले. त्यानंतर संबंधित पोलिसाने आपल्याकडून चूकून लाठी मारली गेली असे म्हणत माफी मागितले. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पोलीस अधिकाऱ्यांची माफी मागताना आणि खेद व्यक्त करताना ऐकू येत आहे.
On Camera: There was a lathi charge against the protesters who gathered on the busy road as a part of the Bharat Bandh protest in Patna.
Policeman mistakenly lathi-charges the SDM in Patna🤣🤣😇😇, video goes viral.
SDM Shrikant Kundlik Khandekar was standing in the middle of… pic.twitter.com/3K7XOqvovu— SK Chakraborty (@sanjoychakra) August 21, 2024