Delhi Liquor Sale : तळीराम सुधारले! मागील वर्षीच्या तुलनेत मद्यविक्रीत मोठी घट…
दिल्लीत मागील वर्षीच्या तुलनेत मद्यविक्रीमध्ये मोठी घट झाल्याचं समोर आलं आहे. यासंदर्भात कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन अल्कोहोलिक बेव्हरेज कंपनीज (CIABC) या अल्कोहोल उद्योगाच्या संघटनेने दिलेल्या अहवालात सांगण्यात आलं आहे. दरम्यान, मागील वर्षी पहिल्या तिमाहीत 263 टक्क्याने मद्यविक्रीत वाढ झाली होती, तर दुसऱ्या तिमाहीमध्ये 28 टक्के वाढली आहे.
ऐकावं ते नवलंच! रातोरात दक्षिण कोरियातील लोकांचं वय घटलं; नेमकं हे घडलं तरी कसं?
मागील वर्षीच्या ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत मद्यविक्रीचा वाढीचा दर 19 टक्के होता. मात्र, शेवटच्या तिमाहीत 14 टक्क्यांवर आल्याचं कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन अल्कोहोलिक बेव्हरेज कंपनीने आपल्या अहवालात म्हटलं आहे. त्यानंतर 36 टक्क्याने वाढ झाल्यानंतर मद्यविक्रीच्या धोरणामुळे मद्यविक्रीला चालना देण्यासाठी सवलती देण्यात आल्या होत्या.
Horoscope Today 28 June 2023: आज ‘वृषभ’ राशींला मिळणार चांगली बातमी! मोठा धनलाभ होण्याची शक्यता
अहवालात केलेल्या विश्लेषणानूसार, मद्यविक्रीची वाढ 2022-23 वर्षाच्या पहिल्या तिमाहीत झाल्याचं दिसून येतं. कारण मद्यविक्रीच्या धोरणाच्या पार्श्वभूमीवर स्टॉक लिक्विडेट करण्यासाठी विविध व्यापार योजन आणि जाहिरातबाजी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर विक्रीमध्ये घट होत असल्याचं दिसून आलंय.
शरद पवारांची ‘ती’ मुत्सद्देगिरी ते ठाकरेंचं बंद दार; देवेंद्र फडणवीसांनी सगळंचं बाहेर काढलं…
मद्यविक्रीप्रकरणी भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर दिल्ली उत्पादन शुल्क धोरण मागील वर्षी रद्द करण्यात आले होते. नवं धोरण अंमलात येईपर्यंत जुने धोरणचं सप्टेंबरपर्यंत अवलंबण्यात आलं.
Lew Palter Passed Away : ‘टायटॅनिक’ फेम अभिनेता ल्यू पाल्टरचे निधन
दरम्यान, मद्यविक्रीची वार्षिक वाढ दिशाभूल करणारी आहे कारण ती पहिल्या तिमाहीत चालते, जेव्हा किरकोळ विक्रेते धोरण बदलण्यापूर्वी मद्याची विक्री करण्यासाठी योजना राबवत असल्याचं कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन अल्कोहोलिक बेव्हरेज कंपनीचे अध्यक्ष विनोद गिरी यांनी स्पष्ट केलं आहे.
दिल्लीमध्ये मद्य विक्री चांगली असून महसूलमध्येही चांगलीच वाढ होत आहे. या अहवालाचा आम्ही अभ्यास करणार असल्याचं दिल्ली उत्पादन शुल्क विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केलं आहे.