live now
Bihar Election Result 2025 : बिहारमध्ये मतमोजणीला सुरूवात, NDA की महागठबंधन कोण मारणार बाजी ?
Bihar Election Result 2025 : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचे आज निकाल जाहीर होत आहे .
Bihar Election Result 2025 : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचे आज निकाल जाहीर होत आहे. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 6 नोव्हेंबर आणि 11 नोव्हेंबर या दोन टप्प्यात पार पडलं आहे. मतदान पार पडलं आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे लाईव्ह अपडेट्स तुम्ही लेट्रसअप मराठीवर पाहू शकतात.
LIVE NEWS & UPDATES
-
Bihar Election Result 2025 : AIMIM 5 जागांवर आघाडीवर
Bihar Election Result 2025 :
बिहारमध्ये निवडणूक निकालांचे ट्रेंड समोर येत आहेत. निवडणूक आयोगाने सर्व 243 जागांसाठी ट्रेंड जाहीर केले आहेत. ओवेसींचा पक्ष 5 जागांवर आघाडीवर आहे.
-
Bihar Election Result 2025 : मोकामामध्ये अनंत सिंह आघाडीवर तर रघुनाथपूरमध्ये ओसामा
Bihar Election Result 2025 : मोकामामध्ये अनंत सिंह आघाडीवर तर रघुनाथपूरमध्ये ओसामा
- रघुनाथपूरमध्ये ओसामा 9236 मतांनी आघाडीवर
अनंत सिंह 5000 मतांनी आघाडीवर
महुआमध्ये तेज प्रताप यादव चौथ्या स्थानावर
-
Bihar Election Result 2025 : निवडणूक आयोगाचे 243 जागांसाठीचे ट्रेंड
निवडणूक आयोगाचे 243 जागांसाठीचे ट्रेंड
भाजप- 84
जेडीयू- 77
राजद- 35
लोजप- 22
काँग्रेस- 7
सीपी(एमएल)- 2
#BiharElection2025 | Election Commission declares election trends on all 243 seats in the state.
NDA leading on 188 (BJP 85, JDU 75, LJP(RV) 22), HAMS 4, RLM 2)
Mahagathbandhan on 51 (RJD 36, Congress 6, CPI(ML)L 7, VIP 1, CPI(M) 1) pic.twitter.com/ixEagznlZQ— ANI (@ANI) November 14, 2025
-
Bihar Election Result 2025 : जेडीयू सहा जागांवर 500 पेक्षा कमी मतांनी आघाडीवर
Bihar Election Result 2025 :
निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, सहा जागांवर जेडीयू 1,000 पेक्षा कमी मतांनी आघाडीवर आहे. तर सहा जागांवर ते 500 पेक्षा कमी मतांनी आघाडीवर आहे.
एनडीए
JDU - 80
BJP - 87
LJPR - 22
HAM - 04
RLM - 04महाआघाडी
RJD - 36
INC - 05
VIP - 0
LEFT - 05
IIP - 0इतर
03
-
Bihar Election Result 2025 : तेजस्वी यादव आणि तेज प्रताप पिछाडीवर ; एनडीए 200 च्या जवळ
नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए 200 च्या जवळ पोहचले असून तेजस्वी यादव आणि तेज प्रताप पिछाडीवर असल्याचे निवडणूक आयोगाचे कल दाखवत आहे.
अलीनगरमध्ये मैथिली ठाकूर आघाडीवर
दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार मैथिली ठाकूर आघाडीवर आहेत. चौथ्या फेरीत राजदचे विनोद मिश्रा 4,000 हून अधिक मतांनी मागे आहेत.
राघोपूरमध्ये तेजस्वी यादव पिछाडीवर
महाआघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील राघोपूर मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. निवडणूक आयोगाच्या आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार भाजपचे सतीश कुमार राघोपूर मतदारसंघातून आघाडीवर आहेत, तर राजदचे तेजस्वी यादव अंदाजे 1,273 मतांनी दुसऱ्या स्थानावर घसरले आहेत.
तेज प्रताप यादवसाठीही मोठा धक्का
महुआ विधानसभा मतदारसंघात तेज प्रताप यादव चौथ्या स्थानावर घसरले आहेत. निवडणूक आयोगाने तीन फेऱ्यांच्या मतमोजणीनंतर ही आकडेवारी जाहीर केली. चिराग पासवान यांचे उमेदवार संजय कुमार सिंह या मतदारसंघात आघाडीवर आहेत. राजदचे मुकेश कुमार रोशन दुसऱ्या स्थानावर, एआयएमआयएमचे अमित कुमार तिसऱ्या स्थानावर आणि जनशक्ती जनता दलाचे तेज प्रताप यादव चौथ्या स्थानावर आहेत.
-
Bihar Election Result 2025 : AIMIM ची परिस्थिती काय ?
असदुद्दीन ओवैसी यांच्या नेतृत्वाखालील AIMIM पक्ष सध्या बैसी आणि बलरामपूर या दोन जागांवर आघाडीवर आहे. पक्षाने बैसीमधून गुलाम सरवर आणि बलरामपूरमधून मोहम्मद आदिल हसन यांना उमेदवारी दिली आहे.

-
Bihar Election Result 2025 : माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांना मोठा धक्का
Bihar Election Result 2025 :
बिहार विधानसभा निवडणुकीत शिवदीप लांडे अररियात निवडणुकीच्या मैदानात उतरले होते मात्र विजय शिवतारे यांचे जावई आणि माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांना मोठा धक्का बसला असून मतमोजणीत ते चाैथ्या स्थानावर फेकले गेले आहे.
-
Bihar Election Result 2025 : काँग्रेस ट्रेंडमध्ये 'लोजपा' पेक्षाही मागे
निवडणूक आयोगाने आतापर्यंत 232 जागांसाठी ट्रेंड जाहीर केले आहेत. यामध्ये काँग्रेस लोजपापेक्षा कमी जागा जिंकत असल्याचे दिसून येत आहे.
निवडणूक आयोगाने 232 जागांसाठी ट्रेंडमध्ये
भाजप- 73
जेडीयू- 77
राजद- 42
लोजपा- 18
काँग्रेस- 7
सीपी(एमएल)- 5
-
बिहार निवडणूक निकालापूर्वी धीरेंद्र शास्त्री यांचे मोठे विधान
सनातन संस्कृती असलेले जिंकोत
बिहार निवडणूक निकाल जाहीर होण्यापूर्वी बागेश्वर धाम सरकारचे आचार्य धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले की, जनतेने ज्याला मतदान केले तो जिंकेल. राष्ट्रवादी विचारसरणी आणि सनातन संस्कृती असलेले जिंकोत.
-
Bihar Election Result 2025 : भाजपला धक्का, जेडीयू सर्वात मोठा पक्ष
भाजपला धक्का, जेडीयू सर्वात मोठा पक्ष
निवडणूक निकालांच्या ट्रेंडमध्ये जेडीयूने दिला भाजपला धक्का, सुरुवातीच्या कलमध्ये सर्वात मोठा पक्ष
भाजप- 69
जेडीयू- 76
LJP- 12
इतर- 3
