बिहारच्या राजकारणात नवा भिडू; प्रशांत किशोरांचा ‘जनसुराज’ कुणाला देणार धक्का?

बिहारच्या राजकारणात नवा भिडू; प्रशांत किशोरांचा ‘जनसुराज’ कुणाला देणार धक्का?

Prashant Kishor News : निवडणूक रणानितिकार प्रशांत किशोर यांनी (Prashant Kishor) महात्मा गांधी जयंतीदिनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा करत बिहारच्या राजकारणात (Bihar Politics) एन्ट्री घेतली. बिहारमध्ये २०२५ मध्ये विधानसभा निवडणुक होणार आहे. या निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या रुपात आणखी एक पर्याय राज्यातील जनतेसमोर असणार आहे. या पर्यायावर जनता किती विश्वास दाखवते हा देखील एक प्रश्न असणार आहे. मागील ३५ वर्षांपासून लालू आणि नितीश यांच्या छायेत असणारी बिहारमधील (Bihar News) जनतेला प्रशांत किशोर यांच्या पक्षाकडून काही अपेक्षा ठेवल्या पाहिजेत का हा देखील मोठा प्रश्न आहे. बिहारच्या राजकारणात जनसुराज पक्ष एक नवा पर्याय ठरू शकतो का हा देखील प्रश्न आहे.

तसं पाहिलं तर १९९० पासून बिहारच राजकारण लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) आणि नितीशकुमार या (Nitish Kumar) दोन नेत्यांभोवती फिरत राहिल आहे. अशात आता एक नवा पर्याय समोर आला आहे. प्रशांत किशोर यांनी सगळा होमवर्क करूनच राजकारणात एन्ट्री घेतली आहे. निवडणूक रणनीतीकार म्हणून काम करताना राजकारणातले खाचखळगे त्यांनी बारकाईने अभ्यासले आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षाला दुर्लक्षित करून चालणार नाही. मत देऊन पाहू या या दृष्टिकोनातून विचार केला तर प्रशांत किशोर यांच्याकडून काही अपेक्षा करता येतील.

जनतेचे प्रश्न घेऊन पीके राजकारणात

प्रशांत किशोर यांनी आज जे मुद्दे उचलले आहेत ते बिहारमधील जनतेच्या जिव्हाळ्याचे आहेत. राज्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी दुसऱ्या राज्यांत चालले आहेत. तर युवकही रोजगाराच्या शोधात बाहेर चालले आहेत. ज्यांच्या घरात देखभाल करण्यासाठी कुणीच नाही अशा घरांमध्ये वृद्ध लोकांची संख्या वाढत चालली आहे. शेतीसाठी खर्च वाढत चालला असून उत्पन्न मात्र घटत चालले आहे. या परिस्थितीमुळे राज्यातील शेतकरी हैराण झाले आहेत.

या परिस्थितीत प्रशांत किशोर यांनी शिक्षण, रोजगार, वृद्धांना दरमहा दोन हजार रुपये पेन्शन, रोजगारासाठी महिलांना स्वस्त व्याजदरात कर्ज आणि शेतीला फायद्यात आणण्याचं आश्वासन किशोर यांनी दिलं आहे. या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी प्रशांत किशोर जो प्लॅन सांगत आहेत तो काही एकदम हवाहवाई वाटेल असा नाही. त्यामुळेच जनतेने आपल्यावर विश्वास ठेवावा यासाठी त्यांच्याकडून आणखी एक पर्याय उपलब्ध करून दिला जात आहे.

काँग्रेसला ‘तीन’चा फेरा सुटेना, चौथा CM काही मिळेना; हरियाणात रेकॉर्ड तुटणार का?

जनसुराज अभियान सुरू करण्यामागचा प्रशांत किशोर यांचा उद्देश राजकीयच होता यात काहीच संशय नाही. परंतु त्यांनी याला जन अभियानाचं रूप देत मार्गक्रमण सुरू ठेवलं होतं. पदयात्रेच्या माध्यमातून प्रशांत किशोर जनतेत गेले आणि आपण एक वेगळ्या पद्धतीनं राजकारण करत आहोत असा संदेश देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. या राजकारणाच्या केंद्रस्थानी जनता असेल असे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता. तसेच निवडणुकीच्या आधी वातावरण तयार करण्यातही या यात्रेची मदत झाली.

अभियानानंतर राजकीय पक्षाचं स्वरूप

प्रशांत किशोर यांनी राजकीय पक्षाचं जे स्वरूप ठेवलं आहे. यामध्ये त्यांनी एका गोष्टीची विशेष काळजी घेतली आहे. आपल्या पक्षात लोकांना एक आशेचा किरण दिसावा याची काळजी त्यांनी घेतली आहे. मनोज भारती यांनी पक्षाचे पहिले कार्यकारी अध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहे. मनोज भारती भारतीय विदेश सेवेतील माजी अधिकारी आहेत. त्यांनी आयआयटी मधून शिक्षण घेतलं आहे. प्रशांत किशोर यांनी सामाजिक समीकरणही साधलं आहे. अनुसूचित जातीच्या व्यक्तीला त्यांनी कार्यकारी अध्यक्षपदाची संधी दिली आहे.

राईट टू रिकॉल देणारा पहिला पक्ष

प्रशांत किशोर यांनी राईट टू रीकॉलच मत मांडलं आहे. पक्षाच्या उमेदवारांची निवड देखील जनताच करेल. इतकेच नाही तर आमदाराचे काम आवडले नाही तर सभागृहाची मुदत संपण्याआधी त्यांना हटवण्याचा अधिकारही जनतेला राहिल असे किशोर यांनी स्पष्ट केले होतं. आता व्यावहारिक रुपात प्रशांत किशोर ही गोष्ट अमलात कशी आणणार याचं उत्तर तर येणारा काळच देऊ शकेल. मात्र हा मुद्दा उपस्थित करून त्यांनी आपल्या पक्षाला चर्चेत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रशांत किशोर सांगतात की पहिल्या दिवसापासून जवळपास एक कोटी लोक जनसुराजशी जोडले गेले आहेत. भाजप मात्र ६६ लाख सदस्य असल्याचा दावा करत आहे. २०२० मधील निवडणुकीत भाजपला ३७ लाख मते मिळाली होती. अशा परिस्थितीत आपल्या पार्टीकडे एक कोटी सदस्य असल्याचा दावा प्रशांत किशोर आतापासूनच करत आहेत. यावरून पटना त्यांच्यासाठी दूर नाही असेच वाटत आहे.

२०२० मधील विधानसभा निवडणुकांकडे नजर टाकली तर लक्षात येते की या निवडणुकीत एकूण ७,३६,४७,६६० मतदार होते. यातील ४,१४,३६,५५३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. राजदला सर्वाधिक म्हणजे ५५,२३,४८२ मते मिळाली होती. यानंतर जेडीयू आणि भाजपचा नंबर होता. ४८,१९,१६३ इतकी मते जेडीयूला तर ३६,८५,५१० मते भाजपला मिळाली होती. यानंतरही अशी काही कारणं आहेत ज्यामुळे जनसुराज पक्षावर विश्वास दाखवता येऊ शकतो.

बिहारी राजकारणात ट्विस्ट! नव्या राजकीय पक्षाची एन्ट्री; प्रशांत किशोर यांची घोषणा

आम आदमी पक्षाची स्ट्रॅटेजीही सेम

देशाची राजधानी दिल्लीत बारा वर्षांपूर्वी राजकीय पर्याय म्हणून आम आदमी पार्टीचा जन्म झाला होता. अरविंद केजरीवाल यांनी या पक्षाची स्थापना केली होती. त्यावेळी केजरीवाल यांचं राजकारणाशी काही देणंघेणं नव्हतं. परंतु प्रशांत किशोर तर अनेक वर्षांपासून राजकारणाशी जोडले गेले आहेत. भ्रष्टाचाराविरुद्ध उभ्या राहिलेल्या आंदोलनातून ज्या शक्यता निर्माण झाल्या होत्या त्या पाहता केजरीवाल यांनी पक्ष स्थापन केला होता. त्यावेळी केजरीवाल यांनी सुद्धा आपण वेगळ्या पद्धतीच राजकारण करण्यासाठी आणि राजकारण बदलण्यासाठी आलो आहोत असा दावा केला होता.

सुरुवातीला त्यांनी लोकांची मते जाणून घेत उमेदवारांची निवड केली. क्राउड फंडींगच्या माध्यमातून निधी गोळा केला. व्हीआयपी कल्चरचा विरोध केला. जनतेनेही त्यांच्यावर विश्वास टाकला. पण नंतर मात्र त्यांनी केलेले सर्व दावे धराशयी होत गेले. आता आम आदमी पार्टी सुद्धा अन्य राजकीय पक्षांच्या गर्दीत सामील होऊन फक्त एक राजकीय पक्ष राहिला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube