छत्तीसगडमधील विजापूर-दंतेवाडा सीमेवर मोठी कारवाई, चकमकीत 12 माओवादी ठार
Chhattisgarh Maoists Encounter : छत्तीसगडमधील बिजापूर-दंतेवाडा सीमेवर सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत
Chhattisgarh Maoists Encounter : छत्तीसगडमधील बिजापूर-दंतेवाडा सीमेवर सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत 12 माओवादी ठार झाल्याची माहिती सुरक्षा दलांकडून देण्यात आली आहे. तर या चकमकीत तीन जवान शहीद झाले असून दोन जण जखमी झाले आहे.
गंगलोर परिसरात चकमक
माओवादी कमांडर पापा राव यांच्या हद्दीतील गंगलोर परिसरात ही चकमक झाली असल्याची माहिती आहे. परिसरात अधूनमधून गोळीबार झाल्याने ठार झालेल्या माओवाद्यांचा आकडा वाढू शकतो अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. आतापर्यंत 12 माओवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत आणि परिसरात शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे. बिजापूरचे पोलिस अधीक्षक डॉ. जितेंद्र यादव (Dr. Jitendra Yadav) यांनी सांगितले की, सकाळी 9 वाजल्यापासून डीआरजी दंतेवाडा-बिजापूर (Dantewada-Bijapur) , एसटीएफ, कोब्रा आणि सीआरपीएफ यांचे संयुक्त पथक परिसरात कारवाई करत होते. यादरम्यान सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये अधूनमधून गोळीबार सुरू होता.
बस्तर रेंजचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी चकमकीच्या ठिकाणाहून 12 माओवादी कार्यकर्त्यांचे मृतदेह सापडल्याची पुष्टी केली. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे, ज्यामध्ये एसएलआर आणि 303 रायफल यांचा समावेश आहे. मृत माओवाद्यांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मराठी माणूस होणार भाजप अध्यक्ष? मुख्यमंत्री फडणवीसांसह ‘या’ नावांची चर्चा
या चकमकीत डीआरजी विजापूरचे हेड कॉन्स्टेबल मोनू वदारी आणि कॉन्स्टेबल दुकारू गोंडे शहीद झाले. जखमी सैनिक सोमदेव यादव यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे आणि त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वृत्त आहे.
