कर्नाटकातही डबल इंजिन सरकारलाच लोक निवडून देतील, देवेंद्र फडणवीस यांना विश्वास

  • Written By: Published:
कर्नाटकातही डबल इंजिन सरकारलाच लोक निवडून देतील, देवेंद्र फडणवीस यांना विश्वास

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई सरकार निवडून येईल आणि कर्नाटकात पुन्हा एकदा डबल इंजिन सरकार निवडून येई, अशा विश्वास राज्याचे उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. देवेंद्र फडणवीस सध्या निवडणुकीच्या प्रचारासाठी कर्नाटक दौऱ्यावर आहेत. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे.

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की कर्नाटकातील ५५ लाख घरात शौचालये बांधली गेली आहेत, ६५ लाख लोकांच्या घरात पाणी पोहचले आहे. लाखो लोकांना घर मिळाली आहेत. शेतकऱ्यांना  केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना सहा हजार मिळत आहेत, त्यात राज्य सरकारकडून चार हजार रुपये देण्यात येणार आहेत. महिलांना अनेक योजनांचा फायदा झाला आहे.

Karnataka Election : राजकीय गणितं बदलणार?; माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर काँग्रेसमध्ये दाखल

याशिवाय कर्नाटक सरकारने विद्यार्थ्यांना, समाजातील सर्व घटकांसाठी योजना सुरु केल्या आहेत. आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहोत. व्होट बँकेच राजकारण भाजप करत नाही. अशी भूमिका त्यांनी यावेळी व्यक्त केली.

सीमाभागातल्या वादावर म्हणाले

गेल्या काही महिन्यापूर्वी महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद पेटला होता. त्यावर देखील फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी हा प्रश्न न्यायालयात आहे. अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. याशिवाय महाराष्ट्र सरकारच्या योजना सीमा भागात लागू करण्याच्या मुद्द्यावर या योजना काँग्रेस सरकारच्या काळातच सुरु झाल्या आहेत. अशी भूमिका त्यांनी घेतली.

मुख्यमंत्री साताऱ्यातही ऑनड्युटी; एकाच दिवसांत केला 65 फाईल्सचा निपटारा

एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की महाराष्ट्र सरकार पूर्णपणे स्थिर असल्याचे सांगितले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच 2024 पर्यंत मुख्यमंत्री राहणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालीच 2024च्या निवडणुका लढवू आणि जिंकू, असेही फडणवीसांनी स्पष्ट केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube