… तर भाजपच्या मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही; जंतरमंतरवरुन जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
Manoj Jarange Patil : देशाची राजधानी दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरु असणाऱ्या
Manoj Jarange Patil : देशाची राजधानी दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरु असणाऱ्या आंदोलनाला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या आंदोलाना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे आज दिल्लीत दाखल झाले आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत जर पुन्हा लाठी हल्ला केला तर भाजपच्या मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही असा इशारा दिला आहे.
यावेळी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले की, आपाल्या मायबापाने यांना मतदान केलय. आपल्या जिल्ह्याने, तालुक्याने यांना मतदान केलय. या पुढच्या काळात तुम्हाला धक्का जरी लागला तर आम्ही तुमच्यासोबत आहोत. सगळा देश आणि राज्य तुमच्या पाठिशी आहे असं मनोज जरांगे म्हणाले. तसेच जंतर मंतर (Jantar Mantar) सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत (Delhi) येणार आणि पुन्हा लाठी हल्ला झाला तर भाजपच्या मंत्र्यांना फिरु देणार नाही. जेव्हा जेव्हा आम्हाला बोलावलं तेव्हा आम्ही दिल्लीला येणार असं देखील मनोज जरांगे पाटील म्हणाले.
केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनामा घ्यावा अशी मागणी देखील मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केली. अंतरवालीतही मायमाऊल्या, लेकरांवर लाठ्या चालवल्या होत्या असेही यावेळी जरांगे पाटील म्हणाले. विद्यार्थ्यांनी याच ठिकाणी शांततेत आंदोलन करावं. विद्यार्थी आंदोलन मोडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे असेही यावेळी जरांगे पाटील म्हणाले.
…. तर आंदोलन इतके तीव्र झाले नसते, उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर घणाघात
तर दुसरीकडे या आंदोलनाला राज्यातून देखील पाठिंबा मिळण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला आहे. शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांनी देखील दिल्लीतील जंतर मंतर मैदानात जाऊन या आंदोलनाला पाठिंबा देत मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत निवासस्थानाबाहेर आंदोलन करत मोदी सरकारवर टीका केली आहे. तर या मुद्द्यावर पुढील चर्चेसाठी आता सरकारने जंतर मंतरवर यावे असा इशारा कॉक्रोज जनात पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी दिला आहे.