हलवा सेरेमनीतील हलव्याची खास रेसिपी, कोण तयार करतं? कुणाला मिळतो? जाणून घ्या उत्तरं..

हलवा सेरेमनीतील हलव्याची खास रेसिपी, कोण तयार करतं? कुणाला मिळतो? जाणून घ्या उत्तरं..

Budget 2025 Halwa Ceremony : केंद्रीय अर्थसंकल्पाची तयारी सध्या (Budget 2025) सुरू आहे. शुक्रवारी सायंकाळी हलवा सेरेमनीसह केंद्रीय (Halwa Ceremony) अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी बजेट तयार (Nirmala Sitharaman) करण्याचे संकेत दिले. आता 1 फेब्रुवारीला बजेट सादर करण्यात येईल. हलवा सेरेमनी म्हणजे नेमकी काय संकल्पना आहे. बजेटच्या आधी हा छोटेखानी कार्यक्रम का साजरा केला जातो याची माहिती घेऊ या..

भारतात बजेट तयार करण्याची प्रक्रियेची सुरुवात एक विशेष आणि पारंपारिक समारोहाने केली जाते. यालाच हलवा सेरेमनी असे म्हटले जाते. हा कार्यक्रम सांस्कृतिक परंपरा आहे तसेच वित्त मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांच्या समर्पण आणि प्रतिबद्धतेचंही प्रतीक आहे. बजेट तयार करण्याच्या प्रक्रियेचा अंतिम टप्पा म्हणून हा समारंभ साजरा केला जातो.

हलवा सेरेमनी भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या बजेटआधी आयोजित केली जाते. बजेट सादर होण्याच्या काही दिवस अगोदर हा कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमात हलवा तयार करून तो कर्मचाऱ्यांना वाटप केला जातो. या कार्यक्रमानंतर बजेट तयार करणारे सर्व अधिकारी आणि कर्मचारी लॉक इन कालावधीत प्रवेश करतात. या ठिकाणी त्यांनी बाहेरच्या जगापासून काही काळ अलिप्त केले जाते.

Budget 2023 : अर्थसंकल्पाआधीचा ‘हलवा समारंभ’ का साजरा केला जातो ?

कसा बनतो हलवा

या कार्यक्रमासाठी अर्थ मंत्रालयाच्या स्वयंपाक गृहात पारंपारिक पद्धतीने हलवा तयार केला जातो. यामध्ये रवा, तूप, साखर आणि सुका मेव्यांचा वापर केला जातो. एका मोठ्या पातेल्यात हलवा शिजवला जातो. हलवा तयार करण्यासाठी स्वतः अर्थमंत्री येथे उपस्थित असतात.

हलवा कोण तयार करतं

हलवा सेरेमनीत वित्त मंत्रालयाचे आचारी हा खाद्य पदार्थ तयार करतात. नंतर मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी आणि बाकीच्या स्टाफमध्ये हा हलवा वितरीत केला जातो. अर्थमंत्री स्वतः हा हलवा वाढत असतात. अर्थमंत्र्यांच्या उपस्थितीने हा कार्यक्रम आणखी खास ठरतो. आताही हा कार्यक्रम पार पडला आहे. येथून पुढे बजेट तयार करण्याच्या अंतिम टप्प्यातील कामकाजास अधिक वेगाने सुरुवात होणार आहे.

का केला जातो हलवा समारंभ ?

परंपरेनुसार हलवा समारंभ दरवर्षी साजरा केला जातो. याचं कारण म्हणजे बजेट तयार करणारे कर्मचारी बजेट सादर होईपर्यंत नॉर्थ ब्लॉकच्या परिसरात राहतात. संसदेतील अर्थसंकल्पीय भाषण संपल्यानंतरच हे कर्मचारी आपल्या घरी जातात. दोन वर्षांपूर्वीपर्यंत बजेट छपाईचे कामही केवळ नॉर्थ ब्लॉकमध्येच केले जात होते. आता बजेट पूर्णपणे डिजिटल झाले आहे, त्यामुळे आता बजेट डिजिटल स्वरूपात तयार करावे लागणार आहे. त्याची गुप्तता राखण्यासाठी हलवा समारंभानंतरही काही कर्मचारी नॉर्थ ब्लॉकमध्ये राहतील.

बजेटआधीच चंद्रबाबूंना गुडन्यूज; सरकारनं दिलं मोठं गिफ्ट; बिहारचं काय होणार?

भारतीय संस्कृतीत कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात मिठाई खाण्याने होते. यामुळे बजेटचे काम पूर्ण झाल्यानंतर हा उत्सव साजरा केला जातो. यामुळे मंत्रालयातील कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचे कौतुक होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube