महागाईचा झटका! होळीआधीच गॅसच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या नवे दर..

महागाईचा झटका! होळीआधीच गॅसच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या नवे दर..

LPG Price Hike : मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईने झटका दिला आहे. तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा व्यावसायिक गॅस (LPG Price Hike) टाकीच्या दरात वाढ केली आहे. 19 किलोच्या व्यावसायिक गॅसच्या दरात सरासरी 6 रुपये वाढ करण्यात आली आहे. घरगुती गॅसच्या दरात मात्र कोणतीही वाढ झालेली नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. इंडियन ऑईल द्वारे जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार आता दिल्लीत कमर्शिअल गॅस सिलिंडर 1803 रुपयांना मिळेल. मागील महिन्यात 1797 रुपयांना सिलिंडर मिळत होता. जानेवारीत 1804 रुपये किंमत होती.

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्यांकडून गॅस दराचा आढावा घेतला जातो. घरगुती गॅसच्या किंमती वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा निर्णय कंपन्यांनी आताही घेतलेला नाही. मागील काही महिन्यांपासून घरगुती गॅसचे दर स्थिर आहेत. राजधानी दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडर 803 रुपयांत मिळत आहे. कोलकात्यात 829 रुपये, मुंबईत 802.50 रुपये तर चेन्नईत 818.50 रुपयांना मिळत आहे.

बजेटआधी गुडन्यूज! LPG सिलिंडरच्या दरात मोठा बदल; किती रुपयांनी स्वस्त

तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅसच्या दरात मात्र वाढ केली आहे. या नव्या दरवाढीनुसार कोलकाता शहरात कमर्शिअल गॅस सिलिंडर 1913 रुपयांना मिळेल. मुंबईत 1755.50 रुपयांना मिळेल. फेब्रुवारीत सिलिंडर 1749.50 रुपयांना मिळत होता. त्याआधी जानेवारी महिन्यात 1756 रुपयांना मिळत होता. या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याने हॉटेल, रेस्टॉरंट आणि स्ट्रीट फूड दुकानांतील खाद्य पदार्थ महागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

फेब्रुवारीत झाली होती दर कपात

याआधी फेब्रुवारी महिन्यात ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात सात रुपये कपात केली होती. घरगुती गॅसच्या किंमती मात्र स्थिर ठेवण्यात आल्या होत्या. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने सलग दुसऱ्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीत दर कपात केली होती. आता मार्च महिन्यात मात्र पुन्हा दरवाढ करण्यात आली आहे.

घरगुती गॅसच्या दरात वाढ नाही

या दरवाढीतून घरगुती गॅसधारकांना दिलासा मिळाला आहे. या गॅसच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. काही महिन्यांपासून घरगुती गॅसच्या दरात वाढ झालेली नाही. 14.2 किलो घरगुती एलपीजी सिलिंडर मागील महिन्यातील दरावरच मिळत आहे. दिल्लीत 803 रुपये, कोलकात्यात 829 रुपये, मुंबईत 802.50 रुपये तर चेन्नई 818.50 रुपये या दरांत घरगुती गॅस मिळत आहे.

सोन्याची महागाई थांबेना! सर्वच रेकॉर्ड मोडत 88 हजार पार; लवकरच 1 लाखांचा टप्पा..

follow us
  • fb
  • instagram
  • youtube