चीनला धक्का अन् भारताला लॉटरी.. सहा महिन्यांतच अमेरिकेनं केलं मालामाल
US India Trade : या वर्षातील पहिली सहामाही म्हणजे जानेवारी ते जून या काळात चीनला (China) मागे टाकून अमेरिका भारताचा सर्वात मोठा ट्रेड पार्टनर (US India Trade) बनला आहे. थिंक टँक ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशियटिवने ही माहिती दिली आहे. यात एक डोकेदुखी वाढविणारी बातमी सुद्धा समोर आली आहे. ती म्हणजे भारताचा चीनबरोबरील व्यापार तोटा (India China Business) वेगाने वाढला आहे.
GTRI नुसार भारताने जानेवारी ते जून 2024 या सहा महिन्यांच्या काळात अमेरिकेला 41.6 अब्ज डॉलर्सची निर्यात केली. मागील वर्षातील 37.7 अब्ज डॉलर्स निर्यातीच्या तुलनेत हे प्रमाण दहा टक्क्यांनी जास्त आहे. या नंतर दोन्ही देशांचा व्यापार 62.5 अब्ज डॉलर्स झाला आहे. यामध्येही 5.3 टक्क्यांची वाढ दिसून येत आहे. मागील सहा महिन्यांच्या काळात अमेरिकेने चीनच्या तुलनेत भारताकडून जास्त प्रमाणात वस्तू मागवल्या आहेत. यावरून दोन्ही देशांतील मैत्री आणि विश्वास दिसून येत आहे.
या वर्षातील पहिल्या सहामाहीच्या काळात देशाची व्यापारिक निर्यात 5.41 टक्क्यांनी वाढून 230.51 अब्ज डॉलर्स झाली आहे. याच काळात चीनबरोबरील व्यापारात भारताला तब्बल 41.6 अब्ज डॉलर्सचा तोटा (Trade Deficit with China) झाला आहे. भारताने जानेवारी ते जून या काळात चीनला फक्त साडेआठ अब्ज डॉलरची निर्यात केली. पण दुसरीकडे चीनकडून विविध वस्तूंच्या खरेदीत मोठी वाढ झाली. या काळात भारताने चीनकडून तब्बल 50.1 अब्ज डॉलर्स किमतीच्या विविध वस्तू आयात (India China Import Trade) केल्या.
China Earthquake : चीनमध्ये शक्तिशाली भूकंप! 111 लोकांचा मृत्यू, शेकडो इमारती उद्धवस्त
या वर्षातील पहिल्या सहा महिन्यांतील डेटानुसार भारत 239 देशांना माल निर्यात करतो. यातील 126 देशांबरोबर आयात व्यापार वाढला आहे. भारताच्या एकूण निर्यातीत या देशांचा 75.3 टक्के हिस्सा आहे. ज्या देशांना भारतातून निर्यात वाढली आहे. त्यात अमेरिका, यूएई, नेदरलँड्स, सिंगापूर आणि चीनचा समावेश आहे. यूएईला होणाऱ्या निर्यातीत जवळपास 25 टक्के वाढ झाली आहे. पण याच काळात 98 देशांना निर्यातीत घट झाली आहे. भारताच्या एकूण निर्यातीत हे प्रमाण 24.6 टक्के इतके आहे. या देशांमध्ये इटली, बेल्जियम, नेपाळ आणि हाँगकाँग या देशांना होणाऱ्या निर्यातीत मोठी घट झाली आहे.
औद्योगिक वस्तूंची सर्वाधिक निर्यात
भारताची निर्यात ज्या वस्तूंमुळे वाढली आहे त्यात लोह, फार्मास्यूटिकल्स, मौल्यवान धातू, बासमती तांदुळ, केमिकल, स्मार्टफोन यांचा समावेश आहे. GTRI कडील डेटानुसार औद्योगिक उत्पादनाची एकूण 140.79 अब्ज डॉलर्स इतकी निर्यात झाली आहे. देशाच्या एकूण निर्यातीत हे प्रमाण 61.1 टक्के इतके आहे. कृषी आणि प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थांचे आऊटबाउंड शिपमेंट 2.58 टक्क्यांनी कमी होऊन 26.6 अब्ज डॉलर्सवर आला. सेवा (सर्व्हिस) क्षेत्रातील निर्यातीत 6.9 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. आता ही निर्यात 178.2 अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. आयात 5.79 टक्क्यांनी वाढून 95 अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे.
China : ‘कोरोना’ नाही ‘या’ आजाराने चीन हैराण! शाळा बंद, WHO ने मागितला अहवाल