G-20 Summit : G-20 परिषदेच्या प्रत्येक पाहुण्याला 1000 रुपये मिळणार; UPI वरुन वस्तू खरेदी करता येणार

G-20 Summit : G-20 परिषदेच्या प्रत्येक पाहुण्याला 1000 रुपये मिळणार; UPI वरुन वस्तू खरेदी करता येणार

G-20 Summit : G-20 शिखर परिषदेला हजेरी लावण्यासाठी विदेशी पाहुण्यांच्या आगमनाला सुरुवात झाली असून जगभरातील अनेक देशांतून पाहुणे शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास दिल्लीत दाखल झाले आहेत. या विदेशी पाहुण्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले असून दिल्लीच्या प्रत्येक रस्त्यावर G-20 ची झलक पाहायला मिळत आहे. भारत आता बदलला आहे, देश प्रगतीच्या मार्गावर वेगाने वाटचाल करत आहे, हा संदेश या G20 परिषदेच्या माध्यमातून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. भारताच्या प्रगतीत डिजिटल माध्यमाचा मोठा वाटा असून डिजिटल व्यवहारांनी बँकिंग क्षेत्राला नवे रूप दिले आहे.

‘सनातन धर्म मानणाारे कॉंग्रेस-राष्ट्रवादी राजकारणात अस्पृश्यता पाळतात; प्रकाश आंबेडकरांची घणाघाती टीका

G20 परिषदेत आलेल्या विदेशी पाहुण्यांना डिजिटल इंडियाबद्दल सविस्तर माहिती देण्यात येणार असून तंत्रज्ञानात भारत आता कोणत्याही विकसित देशापेक्षा कमी नसल्याचं दाखवून देण्यात येत आहे. G20 परिषदेसाठी आलेल्या पाहुण्यांच्या व्हॉलेटमध्ये एक हजार रुपये पाठवण्यात येणार असून त्यासाठी केंद्र सरकाकडून 10 लाख रुपयांची व्यवस्था करण्यात आली आहे. व्हॉलेटमध्ये एक हजार रुपये आल्यानंतर पाहुण्यांना G20 परिषदेतील वस्तू खरेदी करण्याचा अनुभव घेता येणार आहे. परिषदेत वस्तू खरेदीसाठी विदेशी पाहुण्यांना UPI मार्फत पेमेंट करता येणार आहे.

फोटो हटवला, समर्थकांना डावललं, नियुक्तीला स्थगिती : शरद पवारांची राष्ट्रवादी पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर

सरकारने सुमारे 1000 विदेशी प्रतिनिधींना UPI तंत्रज्ञानाची माहिती देण्याची योजना आखली असून त्यांना UPI च्या वापराबाबत सांगितले जाणार आहे. परिषदेत आलेल्या सर्व पाहुण्यांच्या UPI वॉलेटमध्ये रु. 1,000 पाठवण्यात येणार असून त्यानंतर ते UPI व्यवहार करणार आहेत. त्यासाठी 10 लाख रुपयांची व्यवस्था करण्यात आली आहे. सरकार परिषदेसाठी येणाऱ्या प्रतिनिधींसाठी पाकीट बनवत आहे.

पालकांनो लक्ष द्या! 3 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना प्री-स्कुलमध्ये पाठवणं बेकायदेशीर, HC चा निर्णय

आलेल्या पाहुण्यांना शिखर परिषदेत स्टॉल्समधून वस्तू खरेदी करता येणार असून G-20 शिखर परिषदेच्या ठिकाणी विविध प्रकारचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. यामध्ये भारतीय परंपरा आणि संस्कृतीशी संबंधित असलेल्या गोष्टी ठेवल्या जाणार आहेत. पाहुणे त्यांच्या वॉलेटमधील पैशाने या वस्तू खरेदी करू शकणार असून जेव्हा पाहुणे स्वत: UPI वापरतील तेव्हा त्यांना भारतात डिजिटल व्यवहार किती सोपे झाले आहेत याची जाणीव होणार आहे.

https://www.youtube.com/watch?v=Qbcr-Nl3sTI

भारतामध्ये आता डिजिटल पेमेंट किती सोपे झाले आहे हे जगाला कळावे हा सरकारचा उद्देश आहे. यातून लोकांचे जीवन कसे चांगले होत आहे. UPI व्यतिरिक्त, G-20 प्रतिनिधींना भारताच्या आधार आणि DigiLocker बद्दल देखील माहिती दिली जाणार आहे . UPI चा वापर फक्त भारतापुरता मर्यादित न ठेवता इतर देशांनीही वापरावा अशी भारत सरकारची योजना आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube