शेअर बाजार सलग पाचव्या दिवशी कोसळला; ‘या’ कारणांमुळे होतेय घसरण

शेअर बाजार सलग पाचव्या दिवशी कोसळला; ‘या’ कारणांमुळे होतेय घसरण

Causes behind Share Market Crash : भारतीय शेअर बाजारात सलग पाचव्या दिवशी विक्रमी घसरण पाहायला मिळत आहे. यामध्ये आज मंगळवारी 11 फेब्रुवारीला सर्वात जास्त घसरण झाली. यामध्ये सेन्सेक्स 1200 अंकांनी कोसळला अन् निफ्टी 23 हजारांखाली आल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे सध्या दोन्ही इंडेक्स लाल रंगात पाहायला मिळत आहे. मात्र ही घसरण का होत आहे? जाणून घेऊ सविस्तर…

काव्य निर्मिती ही मानवी मनाला मिळालेली अमूल्य देणगी; जेष्ठ साहित्यिका आणि उद्योजिका चंद्रलेखा बेलसरे यांचे विचार

भारतीय शेअर बाजार कोसळण्या मागचं मुख्य कारण म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेले कर. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची (Donald Trump) शपथ घेतल्यानंतर खळबळ उडवून देणारे निर्णय घेतले आहेत. त्यांनी प्रचारामध्ये जी जी अश्वासन दिली ती ती त्यांनी पुर्ण करण्याचा जणू धडाकाच लावला आहे. त्यात आता त्यांनी एक निर्णय घेत थेट भारतीय बाजार पाडला आहे.

महाकुंभात ‘नो व्हीकल झोन’ नव्या ट्रॅफिक नियमांमुळे भाविकांचे हाल, करावा लागणार 10 किमी चालत प्रवास

ट्र्म्प यांनी आपल्या व्यापार धोरणात बदल केला आहे. ज्यानुसार अमेरिकेमध्ये केल्या जाणाऱ्या स्टील-अॅल्युमिनियम आयातीवर 25 टक्के टॅरिफ लावला आहे. स्वत:ला ‘टॅरिफ मॅन’ म्हणवून घेणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी (US Tariff) आंतरराष्ट्रीय व्यापार युद्धाची ठिणगी टाकलीय. त्यांनी कॅनडा अन् मेक्सिकोवर 25 टक्के आणि चीनवर (China) 10 टक्के अतिरिक्त कर लादलाय. तसेच त्यांचे कराबाबतचे धोरण सातत्याने बदलत आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजारातून विदेशी गुंतवणूकदार पैसे काढून घेत आहेत. त्यामुळे बाजारामध्ये घसरण होत आहे.

कर्जतमध्ये रंगणार अजिंक्यपद महाराष्ट्र केसरीचा थरार! जिल्हा तालीम संघाच्या वतीने रोहित पवारांना पत्र

दुसरीकडे भारतीय रूपायाचं अवमुल्यन होत आहे. सध्या डॉलरच्या तुलनेत रूपयाची किंमत 88 रूपयांवर पोहचली आहे. ही आतापर्यंतची विक्रमी वाढ आहे. त्यामुळे आयात-निर्यात करताना सरकार आणि निर्यातदार तोट्यात येत आहेत. तर शेअर बाजारात विदेशी गुंतवणुकदारांकडून गुंतवणुक काढून घेतली जाते. त्यामुळे बाजारामध्ये घसरण होत आहे.

शेअर बाजारात हाहाकार! सेन्सेक्स 1200 अंकांनी कोसळला अन् निफ्टी 23 हजारांखाली

शेअर बाजारात विदेशी गुंतवणुकदारांकडून गुंतवणुक काढून घेतली जाते. त्यामुळे बाजारामध्ये घसरण होत आहे. यामध्ये फेब्रुवारीमध्ये विदेशी गुंतवणुकदारांनी भारतीय शेअर बाजारातून जवळपास 12,643 कोटी काढून घेतले आहेत. त्यामुळे बाजारात सातत्याने घसरण होत आहे. तसेच जानेवारीमध्ये देखील गुंतवणुकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 87374 कोटींची विक्री केली होती. जो पर्यंत भारतीय रूपयाचे मुल्य स्थिर होत नाही. तोपर्यंत ही विक्री सुरूच राहिल असा अंदाज तज्ज्ञ लावत आहेत.

स्टार प्लस करणार गेमिंग जगात प्रवेश?, ‘जादू तेरी नजर – डायन का मौसम’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

त्याचबरोबर शेअर्सच्या डिसेंबरच्या तिमाहीमध्ये झालेली निरााशाजनक वाढ आणि कमी झालेल्या किंमती हे देखील बाजारामध्ये घसरण होण्याचे एक कारण मानले जात आहे. यामध्ये आयशर मोटर्सच्या शेअर्समध्ये 7 टक्के घसरण झाली आहे. कंपनीला मात्र Q3 मध्ये वाढीची आपेक्षा होती. त्याचबरोबर एस्कॉर्ट्स कुबोटाच्या शेअरमध्ये 5.3 टक्के घसरण झाली.

अजितदादांनी आणलं बारामतीच्या दुष्काळी भागाला पाणी; दौंड, पुरंदर तालुक्यालाही फायदा

आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढता दबाव डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची (Donald Trump) शपथ घेतल्यानंतर खळबळ उडवून देणारे निर्णय घेतले आहेत. त्याचा आंतरराष्ट्रीय बाजार आणि भारतीय शेअर बाजार दोन्हीवर देखील विपरित परिणाम होणार होत आहेत. यामध्ये हॉंगकॉंग बाजार 0.3 टक्के, एसअॅन्डपी 500 फ्युचर्स ही 0.2 टक्के युरो स्टॉक्स 50 मध्ये देखील घसरण झाली आहे.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्स हाय व्हॅल्यूएशनमुळे बाजारात चिंता आहे. यामध्ये आयसीआयसीआय प्रूडेंशियल AMC चे मुख्य गुंतवणूक अधिकारी एस नरेन यांनी तर स्मॉलकॅप आणि मिडकॅप शेअर्समधून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांकडून गुंतवणुक काढून घेतली जाते. त्यामुळे बाजारामध्ये घसरण होत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube