सत्यपाल मलिकांना सीबीआयची नोटीस: आप, काँग्रेसचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

सत्यपाल मलिकांना सीबीआयची नोटीस: आप, काँग्रेसचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Satyapal Malik On CBI Notice : सीबीआयने जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांना समन्स पाठवले आहे. यावरुन राष्ट्रीय काँग्रेस आणि आपचे (AAP) संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी भाजपवर जोरदार टीका केला आहे. “शेवटी पंतप्रधान मोदींना राहावले नाही. आता सीबीआयने मलिकांना बोलावले आहे. हे होणारच होते.” अशी टीका काँग्रेसने भाजपवर केली आहे.

सीबीआयने पाठवलेल्या नोटीसवर सत्यपाल मलिक यांची प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणाले की, काही प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी सीबीआयने त्यांना कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगितले आहे. मलिक म्हणाले की स्पष्टीकरणासाठी वेळ मागितली असून तो दिली आहे. दरम्यान काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने (आप) मलिक यांच्या समन्सवर तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

अतिक-अश्ररफ हत्येचा बदला घेऊ ; ‘अल कायदा’ची भारताला धमकी

मलिक म्हणाले की, सीबीआयने त्यांना ‘काही स्पष्टीकरणांसाठी’ अकबर रोडवरील सीबीआयच्या कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगितले आहे. मलिक पुढं म्हणाले, “त्यांना काही स्पष्टीकरण हवे आहे, त्यासाठी त्यांनी मला बोलवले आहे. सध्या मी राजस्थानला जात आहे, म्हणून मी त्यांना 27 ते 29 एप्रिल या तारखा दिल्या आहेत, या काळात मी उपलब्ध असणार आहे.”कथित घोटाळ्याच्या संदर्भात सीबीआयने गेल्या वर्षी त्यांची चौकशी केली होती.

काँग्रेसचा हल्ला
यावर काँग्रेसनेही ट्विट करून म्हटले आहे की, ‘अखेर पंतप्रधान मोदी स्वत:ला थांबू शकले नाहीत. सत्यपाल मलिक यांनी आपली पोलखोल देशासमोर उघड केली म्हणून सीबीआयने मलिकांना चौकशीला बोलावले आहे. हे होणारचं होते. अजून एक गोष्ट घडेल… गोडी मीडिया अजूनही गप्प बसेल.’

आरक्षण मर्यादेची भूमिका स्पष्ट करा, अशोक चव्हाणांची मागणी

अरविंद केजरीवाल यांची टीका
आम आदमी पार्टीचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, “संपूर्ण देश तुमच्यासोबत आहे. या भीतीच्या काळात तुम्ही मोठे धैर्य दाखवले आहे सर. ते भित्रे आहेत, सीबीआयच्या मागे लपत आहेत. या महान देशावर जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा तुमच्या सारख्या लोकांनी धैर्याने त्यांचा सामना केला. ते अशिक्षित, भ्रष्ट, देशद्रोही आहेत. ते तुमच्याशी स्पर्धा करू शकत नाही. तुम्ही पुढे चालत राहा सर, तुमचा अभिमान वाटतो.”

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube