Cheetah helicopter Crash Update : ‘चित्ता’ हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये दोन्ही पायलटचा मृत्यू
Cheetah helicopter Crash Update : अरुणाचलमध्ये भारतीय लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर (Cheetah Helicopter Crash) क्रॅशबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या भीषण अपघातात हेलिकॉप्टरच्या दोन्ही पायलचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती भारतीय लष्कराने दिली आहे. हा अपघात झाल्यानंतर दोन्ही पायलट बेपत्ता होते. त्यांचा शोध लष्कराकडून युद्धपातळीवर घेतला जात होता. त्यानंतर आता या दोन्ही पायलटचा या घटनेत मृत्यू झाल्याची पुष्टी लष्कराकडून करण्यात आली आहे. लेफ्टनंट कर्नल बीबी रेड्डी आणि मेजर जयंत असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पायलटची नावे आहेत.
#UPDATE | Both the pilots involved in the crash have lost their lives: Army officials https://t.co/wfC2uNwbs4
— ANI (@ANI) March 16, 2023
आज सकाळी 9.15 च्या सुमारास चीता हेलिकॉप्टरचा हवाई वाहतूक नियंत्रण (ATC) शी संपर्क तुटला होता. अरुणाचल प्रदेशातील (Arunachal Pradesh) मांडला हिल परिसरात भारतीय लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळले होते. त्यानंतर दोन्ही पायलटचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले होते. नेमका हा अपघात कसा झाला याची कोणतेही ठोस कारण अद्याप पर्यंत समोर आलेले नाही.
H3N2 चिंता वाढली : अहमदनगरनंतर पिंपरी-चिंचवडमध्ये दुसरा मृत्यू!
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झाला होता चिता हेलिकॉप्टरला अपघात
गेल्या वर्षी 5 ऑक्टोबर रोजी अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर नियमित उड्डाण करत असताना क्रॅश झाले होते. या अपघातात लष्कराचे दोन पायलट जखमी झाले होते. त्यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तवांगच्या फॉरवर्ड एरिया, जेमिथँक सर्कलच्या बाप टेंग कांग फॉल्स क्षेत्राजवळील न्यामजांग चू येथे नियमित उड्डाण करताना हा अपघात झाला होता. तवांगमधील हेलिकॉप्टरचा हा पहिला अपघात नव्हता. 2017 मध्ये वायुसेनेचे Mi-17 V5 हेलिकॉप्टर क्रॅश होऊन पाच IAF क्रू मेंबर्स आणि दोन आर्मी ऑफिसर्सचा मृत्यू झाला होता. दरम्यान, आज झालेला अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.