Tamil Nadu : ‘थलपथी’ चा विजयी मावळा! 5 वेळा आमदार राहिलेल्या दिग्गजाला रिक्षाचालकाने पाडले

K Vijay Dhamu ज्या हातांनी वर्षानुवर्षे रिक्षाचे स्टिअरिंग धरले, तेच हात आता विधानसभेत जनसामान्यांचे प्रश्न मांडतील.

  • Written By: Published:
Tamilnadu : 'थलपथी' चा विजयी मावळा! 5 वेळा आमदार राहिलेल्या दिग्गजाला रिक्षाचालकाने पाडले

Chennai Auto Driver Beats DMK and AIADMK In Royapuram For TVK : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत यंदा एक असा चमत्कार घडला आहे, ज्याची तुलना पौराणिक ‘डेव्हिड विरुद्ध गोलियाथ’ संघर्षाशी केली जात आहे. राजकारणात कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या, व्यवसायाने एका सामान्य रिक्षाचालकाने राज्यातील दोन सर्वात शक्तिशाली आणि प्रस्थापित राजकीय साम्राज्यांना सुरुंग लावला आहे. सुपरस्टार थलपती विजय यांच्या ‘तमिळगा वेट्री कळघम’ (TVK) पक्षाचे उमेदवार के. विजय धामू यांनी रॉयपुरम मतदारसंघातून ऐतिहासिक विजय मिळवत थेट विधानसभेचे तिकीट कन्फर्म केले आहे.

West Bengal Result : 4 मई ‘दीदी’ गई! बंगालमध्ये बॅनर्जींची ‘ममता’ कमी करणारे शाहंचे 4 ‘धुरंधर’

दिग्गजांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त

रॉयपुरम हा मतदारसंघ 1991 पासून एआयएडीएमकेचे दिग्गज नेते आणि 5 वेळा आमदार राहिलेल्‍या डी. जयकुमार यांचा अभेद्य गड मानला जात होता. मात्र, एका रिक्षाचालकाच्या लाटेपुढे हे सर्व गड कोसळले आहेत. के. विजय धामू यांनी तब्बल 55 हजाराहून अधिक मते मिळवून 14,000 मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. तर, अण्णा द्रमुकचे शक्तिशाली नेते डी. जयकुमार केवळ 18000 मते मिळवू शकले आणि थेट तिसऱ्या स्थानावर फेकले गेले. धामू यांच्या विजयामुळे दिवंगत ज्येष्ठ मंत्री रहमान खान यांचे सुपुत्र असलेले DM चे सुबैर खान यांना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. Chennai auto driver beats DMK and AIADMK heavyweights

रिक्षा स्टँड ते विधानसभा: एका ‘फॅन’चा थक्क करणारा प्रवास

विजय धामू हे अनेक वर्षांपासून विजय यांच्या ‘विजय मक्कल इयक्कम’ (फॅन क्लब) या नेटवर्कचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून तळागाळात काम करत होते. “आम्ही राजकारणात नवीन चेहरे असू, पण जमिनीवर लोकांसाठी आम्ही वर्षानुवर्षे राबत आहोत,” ही त्यांची साधी पण टोकदार भूमिका मतदारांना भावली. उमेदवार घोषणेच्या कार्यक्रमात जेव्हा विजय धामू यांचे नाव जाहीर झाले, तेव्हा ते आपल्या नेत्याला म्हणजेच विजय यांना मिठी मारून ढसाढसा रडले होते. हा फोटो आज तामिळनाडूच्या राजकारणात ‘सामान्य माणसाच्या विजयाचे’ प्रतीक बनले आहे.

‘नान उंगल वेत्तू पिल्लैयागा इंगे निकिरेन’ याच शब्दांनी विजय तामिळनाडूतील निवडणुकांमध्ये बनला ‘थलपती’

विजयाची ‘मॅजिक’ रणनीती

किनारपट्टीचा भाग असलेल्या रॉयपुरममध्ये धामू यांनी मच्छीमार बांधवांसाठी आधुनिक पायाभूत सुविधा आणि सामाजिक सुरक्षेचे ठोस आश्वासन दिले होते, जे मतदारांना पूर्णपणे पटले. त्याशिवाय सुपरस्टार विजय यांनी स्वतःला प्रत्येक मतदारसंघाचा मुख्य चेहरा म्हणून सादर केले, ज्यामुळे धामू यांच्यासारख्या स्थानिक कार्यकर्त्यांना थलपतींच्या अफाट लोकप्रियतेचे रूपांतर मतात करता आले. याच ‘थलपथी फॅक्टर’मुळे नवख्या टीव्हीके पक्षाने 100 हून अधिक जागांचा टप्पा ओलांडला असून स्थानिक उमेदवार ‘जायंट किलर्स’ ठरत आहेत.

Actor To Politics : NTR, MGR अन् आता ‘विजय’… रुपेरी पडद्यावरून थेट सत्तेच्या सिंहासनावर जाणारे अभिनेते !

प्रस्थापित सत्ताधाऱ्यांना चोख प्रत्युत्तर

धामू यांचा हा विजय केवळ एका जागेपुरता मर्यादित नसून, तो डीएमके आणि एआयएडीएमके या पारंपरिक पक्षांच्या अहंकाराला मिळालेली चोख चपराक आहे. 1991 पासून जयकुमार यांचा गड असलेल्या रॉयपुरममध्ये झालेला हा बदल तामिळनाडूच्या राजकारणाचा ‘डीएनए’ बदलण्याचे संकेत देत आहे. ज्या हातांनी वर्षानुवर्षे रिक्षाचे स्टिअरिंग धरले, तेच हात आता विधानसभेत जनसामान्यांचे प्रश्न मांडतील. रॉयपुरमच्या या निकालाने हे सिद्ध केले आहे की, लोकशाहीत जेव्हा ‘बॅलेट’ चालते, तेव्हा मोठमोठ्या दिग्गजांचे ‘किल्ले’ भुईसपाट व्हायला वेळ लागत नाही. रिक्षाचालक ते आमदार असा विजय धामू यांचा हा थक्क करणारा प्रवास भारतीय राजकारणातील एका नव्या युगाची नांदी ठरणार, हे नक्की!

follow us