छत्तीसगडमध्ये मोठी कारवाई! मोस्ट वॉन्टेड कमांडरसह 29 नक्षलवादी ठार

छत्तीसगडमध्ये मोठी कारवाई! मोस्ट वॉन्टेड कमांडरसह 29 नक्षलवादी ठार

Chhattisgarh Naxalites 29 Killed : लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha elections) सुरक्षा दलांनी मोठी कारवाई करत छत्तीसगडमधील (Chhattisgarh ) कांकेर (Kanker) जिल्ह्यात मंगळवारी 29 नक्षलवाद्यांना (Naxalites) ठार केले आहे.या कारवाईनंतर सुरक्षा दलांकडून इन्सास, एके 47, एसएलआर, कार्बाइन, 303 रायफल्स जप्त करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत सर्वोच्च नक्षल कमांडर शंकर राव आणि ललिता यांनाही ठार करण्यात आले आहे. या दोघांवर प्रत्येकी 25 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, नक्षलविरोधी अभियानांपैकी सुरक्षा दलांची ही सर्वात मोठी कारवाई होती. कांकेरमधील छोटेबैठिया येथील चकमक स्थळावरून 29 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले असून सध्या सर्च ऑपरेशन (Search Operation) सुरु आहे. या चकमकीत 3 जवानही जखमी झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

पोलिसांना या परिसरात टॉप कमांडर शंकरराव, ललिता आणि राजू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीवरून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.  मंगळवारी (16 एप्रिल) दुपारी कांकेर जिल्ह्यातील छोटाबेटिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिनागुंडा आणि कोरोनार दरम्यानच्या हापटोला जंगलात ही चकमक बीएसएफ आणि डीआरजी आणि माओवाद्यांच्या संयुक्त दलामध्ये झाली.

.. तर ती माझी चूक आहे का? भर सभेत विशाल पाटलांच्या डोळ्यात अश्रू

तीन जवान जखमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या चकमकीत सुरक्षा दलाचे तीन जवानही जखमी झाले आहे. या जवानांना उपचारासाठी रायपूरला हलवण्यात आले. त्यांची प्रकृती सामान्य असून धोक्याबाहेर आहे. चकमकीच्या ठिकाणी अतिरिक्त फौजफाटा पाठवण्यात आला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज