पुन्हा राजकीय भूकंप; मुख्यंमत्री देणार राजीनामा अन् राज्यसभेसाठी दाखल करणार उमेदवारी अर्ज

CM Siddaramaiah : महाराष्ट्रातील शेजारील कर्नाटकामध्ये राजकीय भूकंप आलं असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या राजीनामा देणार आहे. सिद्धरामय्या 28 मे

CM Siddaramaiah

CM Siddaramaiah : महाराष्ट्रातील शेजारील कर्नाटकामध्ये राजकीय भूकंप आलं असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या राजीनामा देणार आहे. सिद्धरामय्या 28 मे पर्यंत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेस हायकमांडने सिद्धरामय्या यांना सन्मानजनक रितीने मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले आहे. तर दुसरीकडे सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्यानंतर उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार कर्नाटकाचे नवीन मुख्यमंत्री होणार असल्याचं सांगतिलं जात आहे.

माहितीनुसार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) , राहुल गांधी (Rahul Gandhi) , के.सी. वेणुगोपाल आणि कर्नाटकचे प्रभारी रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala) यांच्यासह सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार यांच्या उपस्थितीत नुकतीच एक बैठक पार पडली. सहा तासांहून अधिक काळ चाललेल्या या बैठकीत नेतृत्वातील बदलावर सर्वांचे एकमत झालेय. या बैठकीदरम्यान सिद्धरामय्या यांच्याशी झालेल्या चर्चेत राहुल गांधी यांनी सिद्धरामय्या यांना राष्ट्रीय पातळीवर मोठी भूमिका स्वीकारण्याचा प्रस्ताव दिला आहे.

तीन वर्षांनंतर बदल

कर्नाटकात काँग्रेस सरकारचा कार्यकाळ सुरू होऊन आता तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. या सरकारची सुरुवातच मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार (D.K. Shivakumar) यांच्यात झालेल्या ‘सत्ता-वाटप करारा’ने झाली होती, ज्यानुसार दोन्ही नेत्यांनी प्रत्येकी अडीच वर्षांचा कार्यकाळ सांभाळण्याचे निश्चित करण्यात आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर, सिद्धरामय्या यांनी अखेर राज्याची सत्ता सोडून देऊन राज्यसभेत जाण्यास संमती दर्शवली आहे. राज्याच्या मंत्रिमंडळातील नियुक्त्यांबाबत, तसेच राज्यसभेवर पाठवल्या जाणाऱ्या इतर सदस्यांच्या नामांकनाबाबत सिद्धरामय्या यांच्या पसंतीला आणि मताला योग्य ते महत्त्व दिले जाईल अशी देखील माहिती समोर येत आहे.

या’ राशींना होणार बंपर आर्थिक लाभ; जाणून घ्या सर्व 12 राशींसाठी कसा राहणार आजचा दिवस?

राज्यसभा निवडणुकीची अधिसूचना 1 जून रोजी जारी केली जाणार असून, त्यासोबतच उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होईल. सिद्धरामय्या यांनी राज्यसभेसाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतरच, शिवकुमार यांचा शपथविधी समारंभ पार पडणार आहे.

follow us