…तर भविष्यात सरकारचे अवघड होईल; सीजीपीचे प्रमुख दिपके यांच्याकडून पुन्हा आंदोलनाचा इशारा
भाजीनगरात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आलं. ते विमानतळावर पोहोचताच त्यांच्या गळ्यात पुष्पहार टाकून त्यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला.
कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच सीजेपीचे (CJP) दिललीतील आंदोलन संपलेले आहे. या आंदोलनातील प्रमुख चेहरे आता आपापल्या घरी परतत आहेत. सीजेपीचे संस्थापक आणि हे आंदोलन उचलून धरणारे अभिजीत दीपके हेदेखील त्यांच्या छत्रपती संभाजीनगर या शहरात पोहोचले आहेत.
संभाजीनगरात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आलं. ते विमानतळावर पोहोचताच त्यांच्या गळ्यात पुष्पहार टाकून त्यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला. यावेळी दीपके यांनी माध्यमांशी बोलताना केंद्रातील मोदी सरकारला मोठा आणि गंभीर इशारा दिला आहे. दीपके यांचे हे विधान म्हणजे भविष्यात सीजेपी आणखी मोठं आंदोलन उभारण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे.
लोकसभेत राहुल गांधींचा गंभीर आरोप; शिक्षण मंत्रालय नाही, RSS चालवतंय देशाची शिक्षण व्यवस्था
आज जवळपास 40 दिवसांच्या संघर्षानंतर मी माझ्या घरी आलो याचा मला खूप आनंद आहे. मी भारतात आलो तेव्हापासून आंदोलनच चालू होतं. मागच्या 36 दिवसांपासून आम्ही जंतर-मंतरवर बसलेलो होतो. आमच्या मेहनतीला यश आलं आहे. देशातील सगळ्या विद्यार्थ्यांचा विजय झाला आहे. मी आई-वडिलांना भेटतोय याचा मला आनंद आहे, अशा भावना अभिजीत दीपके यांनी व्यक्त केल्या.
त्याचबरोबर, त्यांनी यावेळी सरकारवर सडकून टीका केली. सरकारने स्वत:मध्ये सुधारणा करावी. 20 जुलै रोजी सरकारमुळे विद्यार्थ्यांचे रस्त्यावर रक्त वाहिले. हे अतिशय वाईट होते. विद्यार्थ्यांचे एवढे रक्त वाहिलेले असताना सरकारचे मन भरलेले नाही. वेगवेगळ्या राज्यात विद्यार्थ्यांना त्रास दिला जात आहे. विद्यार्थ्यंना घरी जाऊन पोलीस त्रास देत आहेत, असा दावा त्यांनी केला.
अटक करण्याची, ताब्यात करण्याची धमकी दिली जात आहे. विद्यार्थी हे दहशतवादी नाहीत. विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहेत. देशाच्या भवितव्याला जर असा त्रास द्यायचा असेल तर भविष्यात सरकारचे अवघड होईल. आज फक्त धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला आहे. हे सरकार योग्य पद्धतीने न वागल्यास भविष्यात हेच विद्यार्थी सरकार बदलतील, असा रोखठोक इशाराही त्यांनी दिला आहे.