CJP आंदोलकांनी नड्डांसमोर ठेवल्या तीन प्रमुख मागण्या; पण नड्डांचा CJP ला आंदोलन मागे घेण्याचा सल्ला !

मंत्री जे. पी. नड्डा यांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या प्रतिनिधींशी आंदोलन मागे घेण्यास सांगितले, तर आंदोलकांनी नड्डांसमोर तीन मागण्या ठेवल्या.

Jp

CJP protesters’ three key demands, J.P. Nadda urges protesters to call off agitation: नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत आक्रमक आंदोलन सुरू आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाने संसद भवनाच्या दिशेने मोर्चा काढण्याचे आवाहन केले होते. मात्र, पोलिसांनी आधीच मोठा बंदोबस्त तैनात करत जंतर-मंतर परिसरात बॅरिकेटींग केली आहे. त्यामुळे अभिजीत दिपके यांच्यासह अनेक आंदोलकांना त्याच परिसरात रोखण्यात आले होते. आता या आंदोलकांला केंद्रीय मंत्री व भाजप नेते जे पी नड्डा ( J.P. Nadda) यांनी एक आवाहन केले आहे.

मोदी सरकार हादरलं…. आंदोलकांवर लाठीचार्ज आणि अश्रुधूर…दिल्लीत काय-काय घडतंय ?

दरम्यान, कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थकांचा एक स्वतंत्र गट संसद भवनाच्या परिसरात पोहोचल्याने सुरक्षा यंत्रणांची मोठी धावपळ उडाली. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. या पार्श्वभूमीवर सरकारकडून आंदोलनकर्त्यांशी संवाद साधण्याचे प्रयत्न सुरू झाले.

कॉक्रोच जनता पार्टी हिम्मत असेल तर निवडणुकीला सामोरे जा’; कंगना रनौत यांची आंदोलनावर टीका!

नड्डांकडून आंदोलन मागे घेण्याचे आवाहन

केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेबाबत माहिती दिली. आंदोलकांनी आपल्या मागण्या सरकारसमोर मांडल्या असून, त्यांच्यासोबत शांततापूर्ण वातावरणात चर्चा झाल्याचे नड्डा यांनी सांगितले. आंदोलन मागे घेऊन जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी आंदोलकांना केले. सरकारकडे चर्चेचा प्रस्ताव आंदोलकांकडून प्रथमच आला असून, सकाळी सुमारे 11:50 वाजल्यापासून चर्चा सुरू असल्याचे नड्डा यांनी सांगितले. तसेच आंदोलकांनी दुपारी चार वाजता सरकारकडे आपले निवेदन सादर केल्याची माहितीही त्यांनी दिली.

नीट पेपरफुटीविरोधात दिल्लीत एल्गार; अभिजित दिपके ताब्यात, डिंपल यादव यांनाही पोलिसांनी रोखले

आंदोलकांच्या प्रमुख तीन मागण्या

कॉक्रोच जनता पार्टीने सरकारसमोर ठेवलेल्या प्रमुख तीन मागण्या

1.सोनम वांगचुक यांची तातडीने सुटका करावी.
2.केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा.
3.आत्महत्या केलेल्या NEET परीक्षार्थींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई द्यावी.

या मागण्यांवर सरकारसोबत चर्चा झाली असली, तरी आंदोलन मागे घेण्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.

‘लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न’; NEET मुद्द्यावर खर्गेंनी संसदेत सरकारला धारेवर धरले

दोन तास वाट पाहायला लावले, भेट फक्त 10 मिनिटांची

दरम्यान, सरकारकडून चर्चा सुरू असल्याचा दावा केला जात असतानाच कॉक्रोच जनता पार्टीकडून वेगळी भूमिका मांडण्यात आली आहे. पक्षाचे प्रवक्ते सौरभ दास यांना जे. पी. नड्डा यांनी चर्चेसाठी बोलावले होते. मात्र, नड्डा यांनी शिष्टमंडळाला तब्बल दोन तास प्रतीक्षा करायला लावली आणि त्यानंतर केवळ 10 मिनिटांची भेट दिली, असा दावा कॉक्रोच जनता पार्टीकडून करण्यात आला आहे. सौरभ दास यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सर्व खासदारांना आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहण्याचे आवाहन केले. पोलिसांकडून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात असून, शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर मारहाण केली जात असल्याचेही त्यांनी म्हटले.

’56 वर्षांच्या तरुणाची नाही, 28 वर्षांच्या तरुणांची गोष्ट करतोय’; मोदींचा राहुल गांधींना टोला

आंदोलनाचा पुढील मार्ग काय?

गेल्या महिनाभरापासून सुरू असलेले हे आंदोलन आता संसद परिसरापर्यंत पोहोचले आहे. एका बाजूला सरकारकडून चर्चेचा मार्ग स्वीकारण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगितले जात आहे, तर दुसरीकडे आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यामुळे सरकार आणि कॉक्रोच जनता पार्टी यांच्यातील चर्चेतून तोडगा निघतो का, आंदोलक आंदोलन मागे घेतात का किंवा आंदोलन आणखी तीव्र होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. नीट पेपरफुटी प्रकरणावरून सुरू झालेला हा संघर्ष आता केंद्र सरकार आणि आंदोलकांमधील थेट चर्चेच्या टप्प्यावर पोहोचला आहे.

follow us