शपथविधी सिद्धरामय्यांचा… पण चर्चा शरद पवार- राहुल गांधींच्या फोटोची!

शपथविधी सिद्धरामय्यांचा… पण चर्चा शरद पवार- राहुल गांधींच्या फोटोची!

बंगळुरु : काँग्रेसचे (Congress)ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी दुसऱ्यांदा विराजमान झाले. बंगळुरुमधील श्री क्रांतीवीरा मैदानावर सिद्धरामय्या यांच्यासह डी. के. शिवकुमार आणि ८ आमदारांचा शपथविधी आज (२० मे) पार पडला. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधी यांची खास उपस्थिती होती. याशिवाय काँग्रेस आणि मित्रपक्षांचेही अनेक बडे नेते, मुख्यमंत्र्यांनी या शपथविधी सोहळ्याला खास उपस्थिती लावली होती. (Sharad Pawar attends the swearing-in ceremony of the newly-elected Karnataka Government in Bengaluru)

मात्र या सर्व सोहळ्यादरम्यान, चर्चा रंगली ती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीची. 82 वर्षीय शरद पवार यांनी खास या शपथविधी सोहळ्यासाठी पुण्याहून थेट बंगळुरु गाठलं. या शपथविधी सोहळ्यासाठी थेट काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पवार यांना फोन करुन उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले होते. याबाबत स्वतः पवार यांनी माहिती दिली होती. त्यानंतर आज पवार यांनी पथविधी सोहळ्यात उपस्थिती दर्शविली. यावेळी राहुल गांधी यांनी पवारांचे विशेष स्वागत करत त्यांच्याशी चर्चा केल्याचंही दिसून आलं. (Congress Leader Rahul Gandhi special gesture to NCP President Sharad Pawar)

राहुल गांधी – शरद पवारांची जवळीक अन् फोटोंची चर्चा :

राहुल गांधी यांनी पवार यांचे व्यासपीठावर अत्यंत हसमुख होऊन अन् हात हातात घेऊन स्वागत केलं. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. आदराने त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी पवार यांनीही राहुल गांधी स्वागतासाठी येताच उभं राहुल त्यांच्या स्वागताचा स्वीकार केला. त्यावेळी मल्लिकार्जून खर्गे अन् राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही पुढे होऊन पवारांचे स्वागत केले. यावेळीच काढण्यात आलेल्या फोटोची महाराष्ट्रभर चर्चा होत आहे.

Siddaramaiah On PM Modi: मोदींच्या शुभेच्छांना सिद्धरमय्यांचे उत्तर; शपथविधी दिवशीच काँग्रेस-भाजप संर्घषाला सुरूवात

मागील काही दिवसांपासून शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यातील संबंध फारसे चांगले नसल्याची चर्चा होती. अदाणी आणि सावरकर या मुद्द्यावर राहुल गांधी यांनी घेतलेल्या भूमिकेवरुन पवार यांनी त्यांना फटकारले होते. पवार यांनी या दोन्ही मुद्द्यांवरुन राहुल गांधी यांचे कान टोचले होते. तसंच अदाणींच्या मुद्द्यावरुन काँग्रेसपेक्षा अत्यंत वेगळी भूमिका घेत अदाणींचे कौतुक केले होते.

मात्र आताच्या फोटोंमधून दोघांमधील दुरावा दुर झाल्याचं दिसत आहे. मागील काही दिवसांपूर्वी पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळीही राहुल गांधी यांनी पवारांना फोन करुन राजीनामा मागे घेण्याची विनंती केली होती. त्यामुळे दोघांमध्ये आता सार काही आलबेल असल्याचं दिसून येत आहे.

Karnataka Oath Ceremony : हत्या, विनयभंग अन् दंगली; सिद्धरामय्यांच्या मंत्र्यांची ‘क्राईम डायरी’

डी. के. शिवकुमार यांनीही घेतले पवारांचे आशीर्वाद :

दरम्यान, आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेले डी. के. शिवकुमार यांनीही शपथ घेण्यापूर्वी शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी पवारांनी त्यांचं अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube