Karnataka Oath Ceremony : हत्या, विनयभंग अन् दंगली; सिद्धरामय्यांच्या मंत्र्यांची ‘क्राईम डायरी’

  • Written By: Published:
Karnataka Oath Ceremony : हत्या, विनयभंग अन् दंगली; सिद्धरामय्यांच्या मंत्र्यांची ‘क्राईम डायरी’

Karnataka Oath Ceremony : कर्नाटकात काँग्रेसच्या दणदणीत विजयानंतर आज (दि.20) मोठ्या दिमाखात शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सिद्धरामय्या यांच्याशिवाय आजच्या सोहळ्यात 8 आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये केएच मुनिअप्पा, जी परमेश्वरा, प्रियांक खरगे, केजे जॉर्ज, एमबी पाटील, रामलिंगा रेड्डी, सतीश जारकीहोली आणि बीझेड जमीर अहमद खान यांचा समावेश आहे. मात्र, सिद्धरामय्या यांच्यासोबत ज्या आमदारांनी शपथ घेतली आहे. यापैकी अनेकांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Karnataka : सिद्धरामय्यांच्या शपथविधीला पवारांची ‘खास’ उपस्थिती; विरोधकांच्या एकजुटीकडे ठाकरेंनी फिरविली पाठ

कर्नाटक सरकारमधील मंत्र्यांचे गुन्हेगारी रेकॉर्ड

जमीर अहमद खान : कर्नाटकातील चामराजपेट विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले जमीर अहमद खान 72 कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत. जमीर यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. बळाचा वापर करून महिलेचा विनयभंग आणि फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याशिवाय धमकावणे, फसवणूक करण्यास प्रवृत्त करणे, सार्वजनिक ठिकाणी बेदरकारपणे वाहन चालवणे अशा गुन्ह्यांमध्येही जमीर यांना आरोपी करण्यात आले आहे.

Karnataka CM : राहुल गांधींनी शब्द पाळला; कर्नाटकातील जनतेसाठी ‘सोनिया’चे दिवस

जी परमेश्वरा : कर्नाटकातील कोरटागेरे विधानसभा जागा जिंकलेल्या परमेश्वरा यांच्यावर दंगल, सुरक्षा धोक्यात आणणे आणि सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरोप आहेत. जी परमेश्वरा हे 8 वर्षांपासून कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळेच त्यांना कर्नाटकचे उपमुख्यमंत्री करण्याची मागणीही होत होती, मात्र तसे होऊ शकले नाही. परमेश्वर 21 कोटींहून अधिक मालमत्तेचे मालक आहेत.

प्रियांक खर्गे : कर्नाटकातील चित्तापूर मतदारसंघातून विजयी झालेल्या प्रियांक खर्गे यांच्यावर अनेक प्रकरणांमध्ये आरोप आहेत. यात मानहानी, दंगल, सार्वजनिक उपद्रव, सुरक्षा धोक्यात घालणे यासारख्या प्रकरणांचा समावेश आहे. एडीआरच्या अहवालानुसार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा मुलगा प्रियांक यांच्याकडे 16 कोटींहून अधिक संपत्ती आहे.

Karnataka : सत्ता कोणाचीही असो; जारकीहोळींच्या घरी एक मंत्रिपद हमखास असतेच!

सतीश जारकीहोळी : कर्नाटकच्या यमकनमर्डी विधानसभेचे आमदार सतीश जारकीहोळी हे 175 कोटींच्या मालमत्तेचे मालक आहेत. वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात आणणे आणि बेकायदेशीरपणे जमाव जमवणे या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Video : मुंबईचा की नागपूरचा डोसा चांगला? आशिष देशमुखांशी देवेंद्र फडणवीसांची ‘खास’ चर्चा

रामलिंगा रेड्डी : कर्नाटकातील बीटीएम लेआउट मतदारसंघातून विजयी झालेले आमदार रामलिंगा रेड्डी 110 कोटींच्या मालमत्तेचे मालक आहेत. त्यांना सरकारी आदेशांचे पालन न करणे आणि दंगली या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे.

केएच मुनियप्पा : कर्नाटक देवनहल्ली विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले माजी केंद्रीय मंत्री केएच मुनियप्पा यांच्यावर धमकी देणे, दुखापत करणे, जाणूनबुजून अपमान करणे आणि शांतता भंग केल्याचा आरोप आहे. मुनियप्पा हे 59 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक आहेत. मुनियप्पा यांना निवडणुकीत 73,058 मते मिळाली तर, त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी जेडी(एस) आमदार एलएन नारायण स्वामी यांना 68,427 मते मिळाली.

Video : पुन्हा दिसला दोस्ताना! भर बैठकीत मोदींनी उठून बायडन यांना दिली ‘जादू की झप्पी’

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube