केरळ निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस खासदार थरूरांच्या ताफ्यावर हल्ला; सुरक्षा रक्षक आणि चालक जखमी
Congress MP Tharoor यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. यामध्ये थरूर यांचे खासगी सुरक्षा रक्षक आणि चालक जखमी झाले आहे.
Congress MP Tharoor’s convoy attacked ahead of Kerala elections; security guard and driver injured : एकीकडे केरळमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तो म्हणजे वांडूर येथे काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. यामध्ये थरूर यांचे खासगी सुरक्षा रक्षक आणि चालक जखमी झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत एकाला ताब्यात घेतले आहे.
फिर्यादीच आरोपी! नाशिकमध्ये खरात प्रमाणे 100 हुन महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्यावर गुन्हा दाखल
हा घटना शुक्रवारी सायंकाळी 7.30 वाजेच्या दरम्यान मलप्पुरम् जिल्ह्यातील वांडूरच्या थिरूवली येथील चेल्लीथोड पूल या ठिकाणी झाली. शशी थरूर हे काँग्रेसने एपी अनिल कुमार यांच्या निवडणूक प्रचारासाठी निघालेले होते. यावेळी रस्त्यातच त्यांच्या ताफ्यावर हा हल्ला झाला. यावेळी दोन गाड्यांनी त्यांचा ताफा अडवला. त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी गाड्या बाजूला करण्यास सांगितलं असता या 5 जणांच्या समुहाने थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला केला.
<blockquote class=”twitter-tweet”><p lang=”en” dir=”ltr”>Truly touched by all the messages and calls expressing concern about the untoward incident last night when my security guard was attacked. He is well and I was untouched. Thank you to all friends and well-wishers. We carried on undaunted yesterday and concluded two more events as…</p>— Shashi Tharoor (@ShashiTharoor) <a href=”https://twitter.com/ShashiTharoor/status/2040276768838578483?ref_src=twsrc%5Etfw”>April 4, 2026</a></blockquote> <script async src=”https://platform.twitter.com/widgets.js” charset=”utf-8″></script>
दरम्यान या हल्यानंतर थरूर यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, त्यांनी एक्स या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले आहे की, हितचिंतकांचे आभार पण माझ्या ताफ्यावर झालेल्या या हल्ल्यामुळे मी अत्यंत दु:खी आहे. पण मी पुर्णपणे सुरक्षित आहे. आम्ही अशा संकटांनी थांबणार नाही. या हल्ल्यानंतर देखील आमचे सर्व नियोजित कार्यक्रम पुर्ण केले. आमचा निवडणूक प्रचार कोणत्याही अडथळ्यांशिवाय सुरूच राहिल. असा विश्वास यावेळी थरूर यांनी व्यक्त केला.