फिर्यादीच आरोपी! नाशिकमध्ये खरात प्रमाणे 100 हुन महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्यावर गुन्हा दाखल

sexually abused in Nashik like Kharat नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचे प्रकरण राज्यात गाजत आहे. असेच आणखी एक प्रकरण नाशिकमध्ये उघडकीस आलय

Letsupp

case has been registered against the person who sexually abused 100 women in Nashik like Kharat : नाशिकमधील (Nashik) भोंदूबाबा अशोक खरातचे (Ashok Kharat) महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रकरण राज्यात गाजत आहे. असेच आणखी एक प्रकरण नाशिकमध्ये उघडकीस आलाय. एका सामाजिक संस्थेचा (NGO) संचालक आणि स्वतःला पत्रकार म्हणवून घेणाऱ्या रवींद्र एरंडे याने 100 हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण केले. या आरोपाखाली आता या एरंडेवर गुन्हा दाखल झाला आहे.

नेमकं प्रकरण काय?

सातपूर येथील एका सामाजिक संस्थेचा (NGO) संचालक आणि स्वतःला पत्रकार म्हणवून घेणाऱ्या रवींद्र एरंडे ने अनेक महिलांबरोबर आक्षेपार्ह व्हिडिओ काढले आहे. या व्यावसायिकाच्या कार्यालयातील ऑफिस बॉय व इतर तिघांनी व्हिडिओ व फोटो असलेली हार्डडिस्क चोरून नेली होती. त्यासाठी ते व्यावसायिकाला ब्लॅकमेल करत होते. तब्बल बारा लाखांची खंडणी मागितल्यानंतर व्यावसायिकाने फिर्याद दिली. त्यानंतर चारही आरोपी पोलिसांनी गजाआड केले आहे. अश्लिल व्हिडिओ काढल्याप्रकरणी महिलांनी तक्रार केल्यास पुढील कारवाई केली जाईल, असेही पोलिसांनी सांगितले आहे.

अंजनगाव खेलोबातील तणाव निवळला! शिवरायांचा पुतळा हलवण्याच्या निर्णयानंतर तोडगा निघाला

सातपूर येथे 63 वर्षाच्या व्यक्तीचे अंगणवाडी सेविका, ब्यूटीपार्लर व इतर व्यवसायाचे कागदपत्रे काढून देण्याचे कार्यालय आहे. या व्यक्तीचे काही महिलांबरोबर असलेले आक्षेपार्ह व्हिडिओ काही जणांच्या हाती लागली होती. ती व्यक्ती संबंधित व्यावसायिकाला ब्लॅकमेल करू लागली होती. व्हिडिओ परत देण्यासाठी व्यावसायिकाला तब्बल बारा लाखांची खंडणी मागितली होती. परंतु व्यावसायिकाने खंडणी न देता सातपूर पोलिस स्टेशनला तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी सापळा रचून चौघांना पकडले.

धक्कादायक! दिंडोरीमध्ये स्नेहसंमेलनाहून परतताना कार विहिरीत कोसळली, एकाच कुटुंबातील 9 जणांचा जागीच मृत्यू

मात्र या दरम्यान एका सामाजिक संस्थेचा (NGO) संचालक आणि स्वतःला पत्रकार म्हणवून घेणाऱ्या रवींद्र एरंडे याने 100 हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण केले. या आरोपाखाली आता या एरंडेवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस तपासादरम्यान जेव्हा रवींद्र एरंडेचा टॅब तपासण्यात आला, तेव्हा पोलिसांना धक्काच बसला. त्यामध्ये तब्बल ८७ आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले. यावरून असे समोर आले की, गरजू महिलांना नोकरीचे आमिष दाखवून आरोपी त्यांचे लैंगिक शोषण करत असे. हा प्रकार एखाद्या मोठ्या रॅकेटप्रमाणे किंवा ‘खरात पार्ट-२’ सारखा असल्याचे बोलले जात आहे.

राज्यावर अवकाळीचं संकट कायम! पुढील 48 तास धोक्याचे तर 16 जिल्ह्यांना येलो अलर्ट

त्यांच्याकडून एक हार्डडिस्क, दोन पेनड्राइव्ह आणि दोन मोबाइल हस्तगत केले आहे. पकडण्यात आलेल्या चार आरोपींची नावे पोलिसांनी जाहीर केली नाहीत. परंतु त्यातील एक आरोपी तक्रार देणाऱ्या व्यावसायिकाकडे तब्बल तेरा वर्षांपासून ऑफिस बॉय म्हणून नोकरीला होता.हार्डडिस्क, पेनड्राइव्ह, मोबाइलमध्ये पोलिसांना महिलांचे तक्रार देणाऱ्या व्यावसायिकाबरोबर अश्लिल व्हिडिओ सापडले आहेत. वेगवेगळ्या महिलांचे तब्बल शंभरहून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ असल्याची माहिती पोलिस उपायुक्त किशोर काळे यांनी दिली.

2003 पासूनचे व्हिडिओ

हार्डडिस्कमध्ये तब्बल 2003 ते 2024 पर्यंत आक्षेपार्ह व्हिडिओ आहेत. हे व्हिडिओ मोबाइल कॅमेऱ्या किंवा हॅण्डी कॅमने काढल्याचा संशय पोलिसांना आहे. व्यावसायिकानेच हे व्हिडिओ वेगवेगळ्या महिलांबरोबर काढल्याचे प्रथमदर्शी दिसत असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. या बाबत महिलांनी तक्रार दिल्यास गुन्हा दाखल करून तपास केला जाणार आहे. महिलांच्या सुरक्षतेची गोपनीय पाळली जाणार आहे. महिलांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. विशेष पथक, क्राइम ब्रँच विशेष पथक या प्रकाराचा तपास करत आहे.

follow us