आधी वादग्रस्त वक्तव्य, नंतर माफी…मोदींवरील टिकेवर खरगे म्हणाले

Untitled Design   2023 04 27T215212.922

Congress President Kharge apologized : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका टिप्पणी केली होती. मात्र आता खरगे यांनी त्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले. खरे तर कर्नाटकातील कलबुर्गी येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना खरगे यांनी पंतप्रधान मोदींवर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. खरगे म्हणाले, माझ्या वक्तव्यामुळे कोणी दुखावले गेले असेल, त्याचा चुकीचा अर्थ काढला गेला असेल आणि कोणी दुखावले गेले असेल, तर त्याबद्दल मी माफी मागतो, असे काँग्रेस अध्यक्ष खरगे म्हणाले.

कोणालाही दुखवण्याचा हेतू नव्हता
खरगे म्हणाले, “आमच्यात वैचारिक मतभेद आहेत. आरएसएस-भाजपची विचारधारा विषारी आहे, पण त्याची तुलना पंतप्रधानांशी करत मी त्यांच्याबद्दल भाष्य केल्याचा दावा त्यांनी केला. कोणत्याही व्यक्तीबद्दल बोलण्याचा किंवा कुणाला दुखवण्याचा माझा हेतू नव्हता.

दरम्यान पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने खरगे यांच्यावर जोरदार टीका झाली होती. यावर खरगे म्हणाले, ही टिप्पणी पंतप्रधान मोदींसाठी नसून भाजपच्या विचारसरणीसाठी आहे. पंतप्रधान मोदींसाठी मी वैयक्तिकरित्या असे कधीच बोललो नाही असे ते म्हणाले होते.

Barsu Refinery : सरकारच्या विरोधात उद्धव ठाकरे मैदानात; आंदोलकांची भेट घेण्यासाठी बारसूला जाणार

खरगे यांच्या वक्तव्यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, खरगे यांचे असे वक्तव्य काँग्रेसची मानसिकता दर्शवते. एकीकडे राहुल गांधी प्रेमाचे दुकान उघडण्यासाठी भारत जोडोला भेट देत आहेत आणि त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष देशाचे पंतप्रधान यांच्याबाबत असे वक्तव्य करत आहेत.

मोठी बातमी ! पुणे लोकसभा पोटनिवडणूक लवकरच जाहीर होणार

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या की, आज ते कोणत्या प्रकारचे विष ओकत आहेत हे देश पाहत आहे. काँग्रेस नेत्याने पंतप्रधान मोदींवर अपमानास्पद टिप्पणी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. अशा शेरेबाजीने त्यांनी कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसचा पराभव निश्चित केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube