Biparjoy Cyclonic : रेल्वेने प्रवास करणार असाल तर सावधान! लांब पल्ल्याच्या 67 गाड्या रद्द…

Biparjoy Cyclonic : रेल्वेने प्रवास करणार असाल तर सावधान! लांब पल्ल्याच्या 67 गाड्या रद्द…

Biparjoy Cyclonic : बिपरजॉय चक्रीवादळाला चांगलचं उधाण आलं असून चक्रीवादळाने आपला मार्ग बदलल्याने बिपरजॉय चक्रीवादळ 15 जून रोजी गुजरात आणि पाकिस्तान कराचीला धडकणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यादरम्यान चक्रीवादळाचा वेग किमी प्रतिसास 125 ते 135 इतका असणार आहे. यासंदर्भातील माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आलीय.(cyclone biparjoy : 67-trains cancelled in view of extremely severe cyclonic storm)

बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाकडून सतर्कता बाळगण्यात आलीय. रेल्वे मंत्रालयाकडून वॉर रुमची स्थापना करण्यात आली असून लांब पल्ल्याच्या 67 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आज 13 जून ते 15 जूनपर्यंत 95 रेल्वे गाड्या रद्द होण्याची शक्यता आहे. तर आत्तापर्यंत 67 गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यादरम्यान, रेल्वे स्थानकावरील खाण्यापिण्याचे स्टॉल चालू राहणार असून प्रवाशांची कुठल्याही स्वरुपाची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यात आलीय. तर ऐनवेळी प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून राज्य सरकारकडून बसेस आणि रुग्णवाहिकांची व्यवस्थी करण्यात आलीय.

Priyanka Gandhi : नर्मदा पूजा अन् शंखनाद… काँग्रेसने भाजपस्टाईल फोडला प्रचाराचा नारळ!

बिपरजॉय चक्रीवादळाचा फटका कच्छ भागासह सौराष्ट्राला बसण्याची शक्यता आहे. या भागात पश्चिम रेल्वेचे भावनगर, राजकोट आणि अहमदाबाद विभाग येतात. या भागांत जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Aurangzeb Issue : असदुद्दीन औवेसी म्हणतात, ‘तो’ फोटो औरंगेजबाचा नाहीच…

बिपरजॉय चक्रीवादळाची धडकी मुंबईनेही घेतली असून मुंबई किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग ताशी 40-50 किलोमीटर असण्याची शक्यता आहे. तर चक्रीवादळामुळे 14 जून आणि 15 जून दरम्यान गुजरातमधील कच्छ, द्वारका, पोरबंदर, जामनगर राजकोट, जुनागड आणि मोरबी जिल्ह्यात अतिमुसळधार बरसण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सीईओ अनिल कुमार लाहोटी आणि इतर बोर्ड सदस्य परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube