Biporjoy : ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाने मार्ग बदलला, हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा

Biporjoy : ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाने मार्ग बदलला, हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा

Biporjoy : बिपरजॉय चक्रीवादळाने आपला मार्ग गुजरात आणि पाकिस्तान किनारपट्टीकडे वळवला आहे. बिपरजॉय चक्रीवादळाने मार्ग बदलल्याने गुजरात आणि पाकिस्तानच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. बिपरजॉय चक्रीवादळ आणखी 10 दिवस लांबणार असल्याचीही शक्यता आहे.

बिपरजॉय चक्रीवादळ पूर्व मध्य अरबी समुद्रावर 11 जून रोजी 2330 IST वाजता अक्षांश 18.9N आणि लांब 67.7E जवळ होतं. हे चक्रीवादळ 15 जूनच्या दुपारपर्यंत मांडवी (गुजरात) आणि कराची (पाकिस्तान) दरम्यान धडकण्याची शक्यता हवामान विभागाने ट्टिटद्वारे दिलीय.

न घडलेल्या घटनेचे राजकारण करू नका! वारकऱ्यांची सुरक्षा महत्वाची, फडणवीसांनी विरोधकांना सुनावले

काही दिवसांपासून ग्लोबल वार्मिंगमुळे अरबी समुद्रावरील चक्रीवादळ वारंवार रौद्र रुप धारण करीत असल्याचं हवामान तज्ज्ञांसमोर आलं होतं. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं 10 दिवसानंतर 6 जून रोजी चक्रीवादळात रुपांतर झालं. हे चक्रीवादळ मोखा चक्रीवादळानंतरचं सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ असल्याचं बोललं जात आहे.

Rakesh Tikait : नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावरून पायउतार होणार…; शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भविष्यवाणी

बिपरजॉय चक्रीवादळ कच्छच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. हे जास्त काळ टिकणारे चक्रीवादळ आहे. बिपरजॉय अलीकडच्या दशकात भारतावर प्रभाव टाकणारं आणि सर्वात दीर्घकाळ टिकणारं चक्रीवादळ ठरणार असल्याची भारतीय हवामान विभागाकडून माहिती दिलीय.

दरम्यान, या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सौराष्ट्रासह कच्छच्या किनारपट्टीवर प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. इथल्या मच्छिमारांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आलीय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube