DA Hike Announced : केंद्र सरकारने दिलं कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट; पाहा किती वाढणार पगार?
DA Hike Announced : केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये (DA Hike Announced) म्हणजे डीएमध्ये तब्बल 4 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या काळात केंद्रिय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. ती म्हणजे त्यामुळे आता हा भत्ता 42 टक्क्यांवरून 46 टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे केंद्रिय कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ होणार आहे.
पाहा कीती वाढणार पगार?
केंद्रिय कर्मचाऱ्यांना हा वाढलेला डीए 1 जुलैपासून लागू होणार आहे. त्यात सरकारच्या या निर्णयाचा फायदा 1 कोटींहून अधिक नागरिकांना होणार आहे. तसेच यात 60 लाखांपेक्षा अधिक पेन्शनधारकांचा देखील समावेश आहे. तर सरकारकडून वर्षातून दोनदा केंद्रिय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्ये सुधारणा करते. या अगोदर जानेवारीमध्ये देखील 4 टक्क्यांनी केंद्रिय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ झाली होती.
पहिल्याच आठवड्यात मालदीवमधून भारतीय सैन्य हुसकावून लावणार; मोहम्मद मुइझ्झू यांची घोषणा
सरकारकडून डीएची गणना औद्योगिक कामगारांसाठी (CPI-IW) ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारे हा डीए दिला जातो. सरकार महागाई दराची आकडेवारी लक्षात घेऊन महागाई भत्त्याबाबत अंतिम निर्णय घेते. महागाई जितकी जास्त असेल तितकी कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ अपेक्षित असते. आता हा भत्ता 42 टक्क्यांवरून 46 टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे केंद्रिय कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ होणार आहे. केंद्रिय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे. ज्या कर्मचाऱ्याला सध्या मूळ वेतन 18000 पगार असेल आणि 42 टक्के दराने महागाई भत्ता 7560 असेल तर आता 4 टक्के वाढीने महागाई भत्त्या 8280 होईल त्यामुळे पगारात 720 रूपायांची वााढ होणार आहे.