Delhi Service Bill : लोकसभेनंतर आता राज्यसभेतही दिल्ली सेवा विधेयक मंजूर…

Delhi Service Bill : लोकसभेनंतर आता राज्यसभेतही दिल्ली सेवा विधेयक मंजूर…

Delhi Service Bill : लोकसभेनंतर आता राज्यसभेतही दिल्ली सेवा विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आलंय. या विधेयकाला 131 खासदारांनी पाठिंबा दिला असून 102 खासदारांनी विरोध दर्शवला होता. अधिवेशनात प्रचंड गोंधळानंतर राज्यसभेत हे विधेयक पारित करण्यात आलं आहे. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने विरोधी पक्ष इंडिया आघाडीसाठी आज राज्यसभेत दिल्ली सेवा बिलाविरोधात मतदान करणं गरजेचं होतं. अखेर देशातल्या विरोधी पक्षांच्या सर्वच खासदारांनी आपली एकजूट दाखवून दिली आहे. दिल्ली सेवा बिलाला 102 खासदारांनी विरोध दर्शवला आहे. या विधेयकानूसार आता दिल्लीच्या अखत्यारीत अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकारी नायब राज्यपालांकडे जाणार हे स्पष्ट झालं आहे.

राजधानी दिल्लीतील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्याचे अधिकार केंद्र सरकारच्या हाती येण्यासाठी दिल्ली सेवा विधेयक 2 ऑगस्टला लोकसभेत मांडण्यात आलं होतं. त्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी विधेयकावर आपलं मत मांडताच विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं होतं. अखेर दुसऱ्या दिवशी 3 ऑगस्टला विधेयकावर चर्चा सुरु झाली आणि विधेयक मंजूर करण्यात आले. हे विधेयक मंजूर झालं तेव्हा विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहातून वॉकआऊट केलं होतं.

उद्धव ठाकरे महाराष्ट्र अन् पक्षासाठी नष्टर.., चित्रा वाघ यांच्या ट्विटने लक्ष वेधलं

दिल्ली सेवा विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर राज्यसभेत हे विधेयक सादर करण्यात आलं होतं. दिवसभर या विधेयकावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर सभापतींनी विधेयकाच्या मंजुरीसाठी मतदान घेण्यात आलं होतं. या विधेयकाला सत्ताधारी खासदारांनी पाठिंबा दिला तर विरोधी पक्षाच्या सर्वच खासदारांनी विरोध दर्शवल्याचं दिसून आलं आहे. या विधेयकाला भाजपच्या 131 खासदारांनी पाठिंबा तर विरोधी पक्षाच्या 102 खासदारांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे भाजपच्या खासादारांच्या मतांचं संख्याबळ अधिक असल्याने दिल्ली सेवा विधेयक मंजूर करण्यात आलं आहे.

दरम्यान, दिल्ली सेवा विधेयकाला विरोध दर्शवण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देशभरातील भाजपविरोधी खासदारांकडे या विधेयकाला विरोध दर्शवण्याची विनंती केली होती. केजरीवाल यांनी महाराष्ट्रातल्या विरोधी नेत्यांची भेट घेतली होती. अखेर आज लोकसभा आणि राज्यसभेत दिल्ली सेवा विधेयक मंजूर झाले आहे. या विधेयकाविरोधात विरोधी पक्षांची बांधण्यात आलेली एकजूट मताच्या स्वरुपात दिसून आली आहे. त्यामुळे आता आगामी निवडणुकीतही विरोधी पक्षांची (इंडिया) ही एकजूट कायम राहणार असल्याची चिन्हे आजच स्पष्ट झाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube