Neet Paper Leak Protest : दिल्लीत पुन्हा हिंसाचार! दगडफेक अन् आंदोलकांवर लाठीचार्ज, नवी अपडेट

दिल्लीतील जंतर-मंतरवर पुन्हा एका हिंसाचार सुरु झाला असून आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज सुरु केल्याची घटना समोर आलीयं.

Untitle (9)

Neet Paper Leak Protest : नीट पेपर लिक प्रकरणी दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान हिंसाचाराची (Neet Paper Leak Protest) घटना घडल्यानंतर आता पुन्हा एकदा दगडफेक आणि आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्याची नवीन अपडेट समोर आलीयं. नीट पेपर लिक प्रकरणी केंद्रीय उच्च शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतर इथं कॉक्रोच पार्टीचं आंदोलन सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

खाद्यपदार्थांत भेसळ आढळल्यास काय करावे?, अन्न व प्रशासन विभागाकडं तक्रार कशी करावी?

एकीकडे विरोधक आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरले आहे तर दुसरीकडे, जंतरमंतरवर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाल्याची घटना घडली. दिल्लीतील जंतरमंतर इथं कॉक्रोच पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके उपोषण करत आहे. आज २२ जुलैच्या रात्री अचानक आंदोलनाला पुन्हा एकदा हिंसक वळण मिळालं असून जंतर-मंतरवर जमलेला आंदोलकांचा जमाव पुढे टॉलस्टॉय मार्गावर पोहोचला. यावेळी आंदोलकांनी पोलीस आणि रॅपिड अॅक्शन फोर्सच्या जवानांवर दगडफेक आणि बाटल्या फेकल्याचा आरोप केला आहे.

नीट पेपर लिक प्रकरणी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर आंदोलन करताना राहुल गांधी यांना पोलिसांनी फरफटत नेलं. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी अमानूषपणे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला आहे. या संपूर्ण घडामोडींनंतर राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार गांधी यांनी परिषदेतून पंतप्रधान मोदी यांनी माफी मागून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याची मागणी केलीयं.

follow us