Manipur violence : मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांची हकालपट्टी करा, भाजपच्या मित्रपक्षांची मागणी
Manipur violence : मणिपूर सरकार दोन समुदायांमधील हिंसाचार रोखण्यासाठी प्रयत्न करत असतांना बुधवारी दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढल्याचा व्हिडिओ (Manipur Video) व्हायरल झाला. या घटनेबाबत देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचे काल संसदेतही तीव्र पडसाद उमटले होत. देशातील जनता रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध करत आहे. तर आता ईशान्य भारतातील राजकीय पक्षांनीही या घटनेचा तीव्र निषेध केला. एनडीएच्या (NDA) काही घटक पक्षांचाही यात समावेश आहे. गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी, आणि मुख्यमंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, अशी मागणी या भाजपचे मित्रपक्षाचे नेते लोर्हो पफोजे (Lorho Pfoje) यांनी केली. (Dismiss the Chief Minister of Manipur)
भाजपचे मित्रपक्ष नॅशनल पीपल्स फ्रंटचे नेते आणि मणिपूर बाह्य मतदारसंघाचे खासदार लोर्हो पफोजे म्हणाले, राज्यातील संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कोलमडली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्याची जबाबदारी स्वीकाराययला पाहिजे. त्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा अन्यथा त्यांची हकालपट्टी करावी.
आसाम महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा मीरा बोरठाकूर म्हणाल्या, महिलांवरील हिंसाचाराची घटना 74 दिवसांनंतर समोर आली आहे. तोपर्यंत राज्य सरकार आरोपींना वाचवून घटनेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत होते. मणिपूर सरकारला आता सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असं त्या म्हणाल्या.
IAS Transfer : केंद्राच्या दट्ट्यानंतर थेट आयएएसच जिल्हाधिकारीपदावर!
मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांची नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) एनडीएचा घटक पक्ष आहे. ते म्हणाले, मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेने मी खूप व्यथित झालो आहे. ही घटना निंदनीय आणि अमानवी आहे. या घटनेचा मी तीव्र निषेध करतो. जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
भाजपचे मित्रपक्ष नॅशनल पीपल्स फ्रंटचे नेते आणि मणिपूर बाह्य मतदारसंघाचे खासदार लोर्हो पफोजे म्हणाले, राज्यातील संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कोलमडली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्याची जबाबदारी स्वीकाराययला पाहिजे. त्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा अन्यथा त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी केली.
मिझो नॅशनल फ्रंटचे नेते आणि मिझोरामचे मुख्यमंत्री झोरामथंगा हे भाजपच्या मित्रपक्षांपैकी एक आहेत. त्यांनी व्हायरल झालेल्या व्हिडिओला क्रूर, हृदयहीन, भयानक, घृणास्पद आणि अमानवी असल्याचं सांगितलं. झोरमथंगा म्हणाले, मणिपूरमध्ये सध्या जो संघर्ष सुरू आहे, त्यावरून संपूर्ण ईशान्य भारतासाठी काहीतरी ठोस पावले उचलण्याची गरज आहे. जे फक्त केंद्र सरकारच्या माध्यमातूनच होऊ शकते.