भारतात एलपीजी गॅसचा तुटवडा कायम; केंद्र सरकार पीएनजी कनेक्शन वाढवण्याच्या तयारीत

आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे इंधन तुटवडा भासत आहे, एलपीजी सिलेंडर मिळावा म्हणून रांगा लागल्या आहेत.

News Photo   2026 03 31T182447.463

सध्या देशातील काही भागात गॅस (Cylinder) टंचाईचा सामना करावा लागत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर एलपीजी गॅस तुटवड्या संदर्भात भारत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. पाणी कनेक्शन, वीज कनेक्शन प्रमाणेच आता पीएनजी कनेक्शनही मिळणार असल्याची चर्चा आहे. पीएनजी कनेक्शन देण्याच्या संदर्भात आज रात्री उशिरापर्यंत या संदर्भात निर्णय जारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पाणी कनेक्शन आणि वीज कनेक्शन देण्यासाठी ज्या अटी व नियम आहेत याप्रमाणे PNG कनेक्शन देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. आखाती देशातील युद्धामुळं एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा जाणवू लागला आहे. यावर उपाय म्हणून भारत सरकार आता PNG ची निर्मिती वाढवत आहे. 9 लाख मेट्रिक टन PNG तयार होत होता, आता 11 लाख मेट्रिक टन एवढी क्षमता वाढवण्यात आली आहे. यासाठी राज्य सरकारने आता सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकांना पीएनजी कनेक्शन देण्यासाठीच्या अटी शिथिल करण्याचे आदेश दिले आहेत.

गॅस टंचाईत अवैध रिफिलिंगवर कारवाई; एक आरोपी जेरबंद, 33 हजारांचा मुद्देमाल हस्तगत

आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे इंधन तुटवडा भासत आहे, एलपीजी सिलेंडर मिळावा म्हणून रांगा लागल्या आहेत. अशातच राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जैन धर्मीयांचा ‘आंबील की ओली’ या सणासाठी एलपीजी ची गरज भासल्यास आम्हाला संपर्क करा असे म्हणणारे पत्र लिहिले आहे. सणादरम्यान भाविकांना अन्नासाठी आणि धार्मिक विधींसाठी गॅसची कमतरता भासू नये, या उद्देशाने लोढा यांनी जैन संस्था आणि सोसायट्यांना हे पत्र लिहिले आहे.

जैन समुदायाला गॅसची आवश्यकता असल्यास त्यांनी थेट माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा,” असे आवाहन या पत्राद्वारे करण्यात आले आहे. या पत्राला आता मनसे कडून उत्तर देण्यात आले आहे. मनसे ने थेट गैस सेवा पुरविणाऱ्या एजेंसी ला पत्र दिले आहे. या पत्रात जनतेला होणारा त्रास, मंत्र्यांकडून एका विशिष्ट समाजाला गैस द्यावा म्हणून दबाव टाकला जाऊ शकतो असा टोला लगावला आहे. जर गॅसचा काळाबाजार झाला तर मनसे कठोर भूमिका घेईल असेही म्हटले आहे.

follow us