राज्यसभेच्या 7 जागांसाठी बिगुलं वाजलं! 16 मार्चला मतदान; पार्थ पवारांना संधी मिळण्याची शक्यता?

महाराष्ट्रातील ७ जागांसाठी होणारी ही निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. विधानसभेतील पक्षीय संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • Written By: Published:

RajyaSabha Election Dates Update : राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक घोषित करण्यात आली असून, 5 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार असून, 16 मार्चला मतदान होणार आहे. महाराष्ट्र, ओडिसा, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, छत्तीसगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, तेलंगणा या राज्यांमध्ये राज्यसभेच्या निवडणुका पार पडणार असून, महाराष्ट्रातून पार्थ पवार यांची राज्यसभेवर वर्णी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महाराष्ट्रातून निवृत्त होणारे राज्यसभा सदस्य

– शरद पवार राष्ट्रवादी- काँग्रेस (SP)
– रामदास आठवले- आरपीआय (आठवले)
– प्रियंका चतुर्वेदी-शिवसेना (UBT)
– डॉ. भगवत कराड-भाजप
– फौजिया खान-राष्ट्रवादी काँग्रेस (SP)
– रजनी पाटील -काँग्रेस
– धैर्यशील पाटील-भाजप

महायुतीत जागा वाटप कसं होणार?

महायुतीच्या वाट्याला विधानसभेतील संख्याबळानुसार ६ जागा येणार आहे. मात्र, या सहा जागांचे वाटप भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार गटामध्ये कसे होणार, यावर सध्या लक्ष लागलं आहे. राजकीय वर्तुळात भाजपला चार जागा, तर शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांना प्रत्येकी एक जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्य विधानसभेचे सध्याचे संख्याबळ हे 286 इतके आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे दोन जागा रिक्त आहेत. एक जागा निवडून येण्यासाठी 37 आमदारांचा कोटा असेल. सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 10, काँग्रेसचे 16 आणि उद्धवसेनेचे 20 असे तीन पक्षांचे मिळून 46 आमदार आहेत. माकप आणि शेकापचे प्रत्येकी एक सदस्य आहेत.

 

follow us