निवडणूक आयोग अॅक्शन मोडवर; EVMs वर टेप प्रकरणात फेरमतदानाचे आदेश
West Bengal Election : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज 142 जागांवर मतदान प्रक्रिया
West Bengal Election : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज 142 जागांवर मतदान प्रक्रिया सुरु असून काही मतदारसंघात ईव्हीएमवर टेप लावण्यात आल्याचा आरोप भाजपचे अमित मालवीय यांनी केला आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत आरोप केला की, फलता विधानसभा मतदारसंघात (Falta Assembly Constituency) ईव्हीएमवर टेप लावण्यात आले आहे. ज्यामुळे भाजप उमेदवाराचे नाव झाकले गेले आहे. अमित मालवीय यांनी केलेल्या या आरोपानंतर आता निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेत ज्या ज्या मतदारसंघात अशा घटना घडल्या आहेत तिथे फेरमतदान घेण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत पश्चिम बंगालचे (West Bengal Election) मुख्य निवडणूक अधिकारी मनोज कुमार अग्रवाल (Manoj Kumar Agarwal) म्हणाले की, ज्या कोणत्याही मतदान केंद्रावर ईव्हीएमवर काळी किंवा पांढरी टेप लावलेली आढळेल तिथे फेरमतदान घेतले जाईल. तसेच जर एखाद्या विशिष्ट मतदारसंघात मोठ्या संख्येने मतदान केंद्रांवर अशा प्रकारची टेप आढळल्याच्या घटना समोर आल्या तर संपूर्ण मतदारसंघात फेरमतदान घेण्याचे आदेश दिले जातील असं देखील मनोज कुमार यांनी स्पष्ट केले आहे.
This is what Mamata Banerjee was defending when she spoke up for Jehangir Khan, a criminal contesting on a TMC ticket from Falta in Diamond Harbour.
In several polling booths, the option to vote for the BJP has been blocked using a tape, effectively preventing voters from… pic.twitter.com/sKw3mcdA86
— Amit Malviya (@amitmalviya) April 29, 2026
भाजपचे (BJP) अमित मालवीय (Amit Malviya) यांनी आरोप करत तक्रार दिली होती की, ईव्हीएमवर टेप लावल्यामुळे त्यांच्या उमेदवाराचे नाव झाकले गेले होते. यानंतर निवडणूक आयोगाने या प्रकरणात चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. तसेच जर तक्रार तथ्यपूर्ण असल्याचे सिद्ध झाले तर फेरमतदानाचे आदेश दिले जातील.
1 मे पासून होणारे ‘हे’ 6 मोठे बदल ; सामान्य माणसावर काय होणार परिणाम ?
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल 4 मे रोजी जाहीर होणार असून यंदा निवडणुकीत टीएमसी आणि भाजपमध्ये जोरदार लढत पाहायला मिळत असल्याने बाजी कोण? मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.