महिलेला ‘Grok AI’ ची शिविगाळ; नंतर म्हणाला, ‘मी मस्करी करत होतो’, नेमकं प्रकरण काय?

महिलेला ‘Grok AI’ ची शिविगाळ; नंतर म्हणाला, ‘मी मस्करी करत होतो’, नेमकं प्रकरण काय?

Elon Musk Grok AI Abuses on X : एलॉन मस्क यांच्या कंपनीने विकसित केलेल्या ग्रोक या एआय चॅटबॉटची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. अनेक युजर्स सोशल मीडियावर ग्रोकला प्रश्न विचारत आहेत. (AI) विशेष म्हणजे ग्रोक देखील त्यांना उत्तर देतो आहे. मात्र, एका युजरला ग्रोकनं चक्क शिव्या दिला आहेत. इतक नाही, तर त्यानंतर मी मस्करी करत होतो, असंही या चॅटबॉटने म्हटलं आहे. त्यामुळे एआयच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

नेमकं प्रकरण का?

एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर युजर्स ग्रोक या चॅटबॉटला प्रश्न विचारत आहेत. टोका नावाच्या एका युजरनं ग्रोकला, माझे 10 सर्वोत्तम म्युच्युअल्स कोण आहेत?” असा प्रश्न विचारला. यावर ग्रोकने कोणतेही उत्तर दिले नाही. त्यानंतर टोनाने पुन्हा एक पोस्ट करत ग्रोकला हिंदीत शिवीगाळ केली. त्यावर ग्रोकनेही तिला जशात तसं प्रत्युतर दिलं.

AI थेट रस्त्यावर! पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मोठा तोडगा, विधानसभेत महत्वाचा निर्णय

ग्रोकचं हे उत्तर सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होते आहे. त्यांच्या या उत्तराने मोठा वाद निर्माण झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे ग्रोकनं यानंतर आपण मस्करी करत होतो, असंही म्हटलं आहे. ग्रोकच्या आक्षेपार्ह उत्तरानंतर आता एआय वापराच्या नैतिकतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. अनेकांनी यावर प्रतिक्रिया देताना ग्रोक एआय चॅटबॉटवर टीका केली आहे, तर काहींनी त्याचं समर्थन केलं आहे. या प्रकारानंतर भारतात एआयला किती स्वातंत्र्य असावे, हा प्रश्नही उपस्थित होतो आहे.

एलॉन मस्क यांच्या xAI कंपनीचा हा Grok AI हा चॅटबॉट एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. X वर दिलेल्या आयकॉनवर क्लिक करून वापरकर्ते याचा वापर करू शकत आहेत. या प्रकरणाने AI च्या वापराबाबत भारतात नवीन चर्चेला तोंड फुटलं असून यावर कंपनी काय पावले उचलते, हे बघणं महत्त्वाचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या