धक्कादायक! शाळेची फी मागितल्याच्या रागातून वडिलांनी केली सहा वर्षाच्या मुलाची हत्या

  • Written By: Published:
धक्कादायक!  शाळेची फी मागितल्याच्या रागातून वडिलांनी केली सहा वर्षाच्या मुलाची हत्या

Father Murder Son :  वडिलांनी शाळेची फी मागितल्याच्या रागातून आपल्या सहा वर्षाच्या मुलाची गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बिहारमधील गोपालगंजमध्ये ही घटना घडली. (Murders) या घटनेने परिरसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. अरविंद कुमार सिंह असं या आरोपी वडिलाचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ८ फेब्रुवारी रोजी दुपारी ही घटना घडली. शनिवारी आरोपीची पत्नी घरी नसल्याने तो अरविंद कुमार सिंह आपल्या मुलाला शाळेतून आणण्यासाठी गेला होता. त्यावेळी शिक्षकांनी शाळेची फी मागितल्याचं मुलाने वडिलांना सांगितलं. त्यानंतर आरोपी वडिलाने घरी येऊन मुलाची हत्या केली. आरोपीने ज्यावेळी मुलाची हत्या केली तेव्हा त्याची मुलगीही घरात होती. तिने हा संपूर्ण प्रकार बघितला. त्यावेळी तो तिलाही मारण्यासाठी गेला. मात्र, मुलगी घाबरून घरातून पळून गेली. तिने शेजाऱ्यांकडे जाऊन संपूर्ण प्रकार सांगितला. शेजाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली.

दिल्लीत पराभव दिसू लागल्याने राहुल गांधींचं कव्हर फायरिंग; फडणवीसांचा टोला

पोलिसांनी लगेच घटनास्थळी दाखल होत आरोपी वडिलाला अटक केली. तसेच मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. आरोपीने धारधार शस्त्राने मुलाचा गळा चिरला होता. तो चाकूही पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केला. दरम्यान, पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता, घर खर्च उचलू शकत नसल्याने आणि अशा परिस्थिती मुलगा सतत शाळेची फी मागत असल्याने वैतागून मुलाची हत्या केल्याची कबुली त्याने दिली.

मी दोन वर्ष विदेशात नोकरी केली, तीन महिन्यांपूर्वी मी भारतात आलो होतो, इथे मेकॉनिक म्हणून काम करत होतो. माझी आर्थिक परिस्थिती कमजोर होती. एकीकडे आईवडील पैसे मागत होते. तर दुसरीकडे मुलगा शाळेची फी मागत होता. मी या परिस्थितीला कंटाळलो होतो. त्यामुळे मुलाची हत्या केली, जेणेकरून त्याला कुणी त्रास देणार नाही, असं त्याने पोलिसांना सांगितलं. १५ वर्षांपूर्वी अरविंदचं लग्न झालं होतं. त्याला एक मुलगा आणि मुलगी होती. लग्न झाल्यापासून तो सासरी राहत होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या