ब्रेकिंग: फ्लाय दुबईच्या विमानात हल्ला झालेला पायलट भारतीय; कॉकपिटमध्ये नेमकं काय घडलं?

Flydubai Flight Indian Pilot Attacked in Cockpit; फ्लाय दुबईच्या कॉकपिटमध्ये ओमानी को-पायलटकडून हल्ला झालेले पायलट भारतीय असल्याचे समोर आले.

Flydubai Flight Indian Pilot Attacked in Cockpit

Flydubai Flight Indian Pilot Attacked in Cockpit: बुधवारी (30 सप्टेंबर) फ्लाय दुबईच्या विमानाच्या कॉकपिटमध्ये ओमानी को-पायलटने कथितरित्या ज्या पायलटवर हल्ला केला, ते पायलट भारतीय नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे. या भारतीय पायलटची ओळख स्मित मच्छर (Smit Machchhar) अशी झाली आहे. फ्लाय दुबईचे FZ1073 हे विमान दुबईहून तेल अवीवकडे जात असताना दोन्ही वैमानिकांमध्ये हिंसक झटापट झाली. या घटनेत पायलट रक्तबंबाळ झाल्यानंतर विमानाचे सौदी अरेबियातील ताबूक येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.

अशोक खरात प्रकरणात कोर्टाचा मोठा आदेश, आरोपींच्या वकिलांना व्हिडीओ पुरावे पाहण्याची परवानगी

स्मित मच्छर हे माजी स्पाइसजेट पायलट असून, त्यांनी जून 2022 मध्ये फ्लाय दुबईमध्ये डायरेक्ट-एंट्री कॅप्टन म्हणून प्रवेश केला. त्यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, त्यांना व्यावसायिक विमान उड्डाणाचा 13 वर्षांहून अधिक अनुभव आहे. त्यांनी बोईंग 737 विमानांद्वारे सुमारे 9,750 तास उड्डाण केले आहे. यात B737-800 आणि B737 MAX 8/9 या विमानांचा समावेश आहे.

फ्लाय दुबईमध्ये येण्यापूर्वी मच्छर यांनी स्पाइसजेटमध्ये 11 वर्षांहून अधिक काळ काम केले. तेथे त्यांनी वरिष्ठ कमांडर आणि त्यानंतर लाइन ट्रेनिंग कॅप्टन म्हणून काम केले. त्यांच्या प्रोफाइलनुसार, स्पाइसजेटमधील कार्यकाळात त्यांनी 9,500 हून अधिक तास उड्डाण केले असून, त्यापैकी 6,400 हून अधिक तास ते पायलट-इन-कमांड म्हणून होते. त्यांनी वैमानिकांचे प्रशिक्षण, तपासणी आणि मार्गदर्शनाचे कामही केले आहे. क्रू रिसोर्स मॅनेजमेंट, फ्लाइट स्टँडर्ड्स, नियमांचे पालन आणि बोईंग 737 विमानांच्या ऑपरेशनमध्ये त्यांना विशेष अनुभव असल्याचे त्यांच्या प्रोफाइलमध्ये नमूद आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाचे 3 मोठे निर्णय; शेतकऱ्यांना दिलासा, रब्बी पिकांच्या MSP मध्ये मोठी वाढ

काय घडलं फ्लाय दुबईच्या विमानात?

फ्लाय दुबईचे FZ1073 हे विमान दुबईहून तेल अवीवकडे जात होते. विमानात सुमारे 180 प्रवासी आणि क्रू सदस्य होते. उड्डाणादरम्यान कॉकपिटमध्ये दोन्ही वैमानिकांमध्ये झटापट झाली. त्यानंतर विमानाचा मार्ग बदलून सौदी अरेबियातील ताबूक येथे विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आले. फ्लाय दुबईने सर्व प्रवासी आणि क्रू सदस्य सुरक्षित असल्याचे सांगितले असून, या प्रकरणाच्या तपासात अधिकाऱ्यांना सहकार्य करत असल्याचे स्पष्ट केले आहे.

इस्रायली अधिकाऱ्यांनी आणि काही प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही वैमानिकांमध्ये हिंसक झटापट झाली. सहवैमानिकाने कॅप्टनवर चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. मात्र, नेमकी घटना कशी घडली आणि या हल्ल्यामागील कारण काय होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

मोठी बातमी! MPSC’च्या सर्व परीक्षा पद्धतीत बदल; आंदोलक विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा

या घटनेदरम्यान विमानातून आपत्कालीन सिग्नलही पाठवण्यात आले होते. यामध्ये विमानात बेकायदेशीर हस्तक्षेप झाल्याचे दर्शवणारा कोड होता. त्यामुळे संभाव्य हायजॅकिंगची भीती निर्माण झाली आणि इस्रायलने लढाऊ विमानं रवाना केली. त्यानंतर विमानाने अचानक मोठ्या प्रमाणात खाली झेप घेतली आणि पुढे ते ताबूककडे वळवण्यात आले.

काही प्रवाशांनी विमानाच्या पुढील भागातून आरडाओरड ऐकू आल्याचे आणि तेथे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचेही सांगितले.

follow us