Fog In Delhi : दिल्लीत दाट धुक्यांची चादर; विमानसेवा विस्कळीत…
दिल्लीत दाट धुक्क्यांची चादर पसरल्याने विमानतळावरील विमानसेवा विस्कळीत झाल्याचं चित्र दिसून येत आहे.
Fog In Delhi : गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत दाट धुक्यांची चादर पडत असल्याने त्याचा परिणाम आता विमानसेवेवर होऊ लागलायं. दिल्लीत दाट धुक्क्यांच्या चादरीमुळे विमानसेवा विस्कळीत झाल्याचं सांगितलं जातंय. मागील अनेक दिवसांपासून ही धुक्यांची समस्या दिल्लीकरांना भेडसावत असून आज त्याचा परिणाम म्हणून थेट विमानसेवाच विस्कळीत झालीयं. त्यामुळे दिल्ली विमानतळावरील 169 विमाने उशिराने धावत आहेत.
खराब हवामान, धुके आणि इतर संबंधित समस्यांमुळे देशांतर्गत फेऱ्या करणाऱ्या विमानांना याचा सामना करावा लागला आहे. त्यांचे नियमित वेळापत्रक कोसळले असून, त्यांना टेक ऑफ आणि लँडिंगसाठी उशिर झाला आहे. वाढती थंडी, खराब हवामान आणि धुके यामुळे परदेशातून भारतात येणाऱ्या विमांनांना लँडिंगसाठी उशिर लागत आहे.
फुटबॉलचा बादशाह वानखेडे स्टेडियमवर; मेस्सीची एन्ट्री होताच चाहत्यांचा एकच जल्लोष
दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कमी दृश्यमानतेमुळे शारजाहून दिल्लीला जाणारे एअर इंडिया एक्स्प्रेसचे एक विमान जयपूरकडे वळवण्यात आले. अशाप्रकारे 3 उड्डाणे जयपूरकडे वळवण्यात आली आहेत. सध्याच्या हवामानामुळे सुमारे विमान उड्डाणे उशीरा झाली आहेत, अशी माहिती दिल्ली विमानतळ अधिकाऱ्याने दिली.
