कामगारांसाठी आयुष्य वेचणाने भाकप नेते स्वातंत्र्यसैनिक कॉम्रेड आर. नल्लाकन्नू यांचं निधन

नल्लाकन्नू यांनी त्यांच्या जवळजवळ आठ दशकांच्या सक्रिय राजकीय कारकिर्द कामगारांसाठी काम करण्यात घालवली.

  • Written By: Published:
Comred

स्वातंत्र्यसैनिक आणि तामिळनाडूमधील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (CPI) ज्येष्ठ नेते आर. नल्लाकन्नू यांचं आज बुधवार (दि. 25 फेब्रुवारी)रोजी दुपारी निधन झालं. त्यांच्यावर चेन्नईतील राजीव गांधी सरका रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच १०१ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. १ फेब्रुवारी रोजी अतिदक्षता विभागात (आयसीयू)मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते.

कॉम्रेड नल्लाकन्नू आरएनके म्हणून ओळखले जाणारे देशातील मोठे कम्युनिष्ट नेते होते. नल्लाकन्नू यांनी त्यांच्या जवळजवळ आठ दशकांच्या सक्रिय राजकीय कारकिर्दीत साधेपणा, प्रामाणिकपणा आणि निःस्वार्थ सेवेचे उदाहरण दिलं. त्यांचा जन्म २६ डिसेंबर १९२५ रोजी तुतीकोरिन (आता थूथुकुडी) जिल्ह्यातील पेरुम्पथु गावात येथे झाला होते. त्यांनी लहानपणापासूनच गरिबी आणि शोषण प्रत्यक्ष पाहिलं, त्यांनंतर आपलं संपूर्ण आयुष्य कष्टकरी कामगार, वंचित यांच्यासाठी लढा देण्यात व्यथित केलं.

ज्येष्ठ प्रकाशक अरविंद पाटकर यांचे निधन; मराठी साहित्य आणि प्रकाशन क्षेत्रातून हळहळ व्यक्त

नल्लाकन्नू त्यांच्या महाविद्यालयीन काळात राजकारणाकडे आकर्षित झाले. भारत छोडो चळवळीदरम्यान त्यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध तरुणांना सक्रियपणे संघटित केलं, ज्यामुळे त्यांना महाविद्यालयातून काढून टाकण्यात आलं होतं. कम्युनिस्ट विचारांनी प्रेरित होऊन, ते १९४३ मध्ये वयाच्या १८ व्या वर्षी सीपीआयमध्ये सामील झाले आणि आठ दशकांहून अधिक काळ राजकीय कारकिर्द त्या पक्षात पूर्ण केली. त्यांनी आयुष्यभर शेतकरी, शेतमजूर आणि उपेक्षित समुदायांच्या हितासाठी लढा दिला.

शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी नांगुनेरी भागात मोठा संघर्ष केला आणि अस्पृश्यता आणि सामाजिक अन्यायाविरुद्धच्या लढाईत ठाम राहिले. स्वातंत्र्यानंतरही, राजकीय दबावामुळे त्यांना १९४९ मध्ये तुरुंगवास भोगावा लागला. पोलीस कोठडीत असताना त्यांच्यावर अत्याचार झाल्याचं वृत्त आहे, हा अनुभव त्यांच्या आयुष्यभराच्या संकल्पाला आकार देत होता. कैद्यांच्या हक्कांसाठी आणि तुरुंगात शिक्षणाच्या प्रवेशासाठीही नल्लाकन्नू यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. नंतरच्या काळात त्यांनी १३ वर्षे सीपीआयचं तामिळनाडू राज्य सचिव म्हणून काम केलं, कठीण राजकीय काळात त्यांनी पक्षाला उभारी दिली.

follow us