G20 Summit : आफ्रिकन युनियन ‘G20’चा स्थायी सदस्य; PM मोदींची घोषणा !

G20 Summit : आफ्रिकन युनियन ‘G20’चा स्थायी सदस्य; PM मोदींची घोषणा !

G20 Summit : राजधानी दिल्लीत आजपासून G20 शिखर संमेलन (G20 Summit) सुरू झाले आहे. भारताच्या अध्यक्षतेत पहिल्यांदाच संमेलनाचे आयोजन होत आहे. या संमेलनासाठी जी 20 राष्ट्रांचे प्रमुख भारतात दाखल झाले आहेत. ही बैठक सुरू होताच एक महत्वाची घडामोड घडली. आफ्रिकन युनियनला (African Union) G20 मध्ये सहभागी करून घेण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच आज याबाबत घोषणा केली. मोदींच्या घोषणेनंतर आता G20 चे नाव बदलून G21 करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.

तसे पाहिले तरी आफ्रिकन युनियनमध्ये 55 देश सहभागी आहेत. आता युनियनचे G20 समूहात (G20 Summit) सहभागी होणे अतिशय महत्वाचे मानले जात आहे. यावेळी मोदी म्हणाले, जगाच्या कल्याणासाठी आता आपल्या सगळ्यांना एकत्रित येत वाटचाल करण्याची गरज आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिषदेसाठी आलेल्या सर्व राष्ट्रप्रमुखांचे स्वागत केले. त्यांनी आपल्या स्वागताच्या भाषणात विविध मुद्द्यांवर मते व्यक्त केली.

Chhattisgarh Election : ‘इंडिया’ला धक्का! ‘आप’ने जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी

काय आहे आफ्रिकन युनियन ?

आफ्रिकी संघ (African Union) 55 देशांचा समूह आहे ज्याचा दर्जा युरोपीय संघाच्या बरोबरीचाच आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला आफ्रिकन युनियनचे प्रतिनिधीत्व करणार अजाली असौमानी यांना निमंत्रित केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार घोषणापत्रात म्हटले आहे, की G20 च्या स्थायी सदस्याच्या रुपात आम्ही आफ्रिकन युनियनचे स्वागत करतो. G20 मध्ये आफ्रिकन युनियनच्या सहभागामुळे सध्याच्या जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी मदत मिळेल.  आफ्रिकन युनियनला G20 मध्ये सहभागी करून घेण्याचा प्रस्ताव पीएम मोदी यांनी जून महिन्यातच ठेवला होता. त्यानंतर आज G20 परिषदेत (G20 Summit) प्रत्यक्षात याची घोषणा करण्यात आली.

आफ्रिकन युनियनमध्ये 55 देशांचा सहभाग आहे. 9 सप्टेंबर 1999 रोजी लीबियातील सिर्ते येथे सिर्ते घोषणेत आफ्रिकी संघाच्या स्थापनेचे आवाहन करत आफ्रिकन युनियनची घोषणा करण्यात आली होती. या गटाची स्थापना 26 मे 2001 रोजी इथिओपियात झाली होती तर 9 जुलै 2002 रोजी दक्षिण आफ्रिकेतील डरबन येथे लाँच करण्यात आले होते. आता आफ्रिकन युनियनला आता G20 समूहात (G20 Summit) स्थायी सदस्याचा दर्जा मिळाला आहे. या महत्वाच्या घडामोडीमुळे जागतिक राजकारणाची समीकरणे बदलणार आहेत.

Video : बायडन यांचा हात धरला; अनेकांसोबत फोटो काढले; कोणार्क चक्राचे महत्त्व काय?

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube