गुजरातमध्ये ISISचा भांडाफोड; 16-18 वर्षांच्या मुलांना देत होते लव्ह जिहादची ट्रेनिंग
Gujarat ATS : गुजरात एटीएसच्या पथकाने पोरबंदरमध्ये मोठी कारवाई केली आहे. एटीएसने ISIS मॉड्यूलचा पर्दाफाश केला असून पोरबंदरमधून एका महिलेसह पाच जणांना अटक केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. कारवाई पूर्ण झाल्यानंतर एटीएस अधिकृत घोषणा करेल. आज सायंकाळपर्यंत माध्यमांना अधिकृत माहिती दिली जाऊ शकते, असे मानले जात आहे.
दहशतवादी कारवायांसंदर्भात त्याची रात्रभर चौकशी करण्यात आली. यादरम्यान ते आयएसआयएसमध्ये सामील होण्यासाठी पळून जाण्याच्या तयारीत होते आणि गेल्या एक वर्षापासून एकमेकांच्या संपर्कात होते, अशी माहिती मिळाली. त्याला पाकिस्तानात बसलेल्या दहशतवादी बॉसकडून संदेश दिले जात होते.
मोदी-शहांच्या रडारवर शिंदेंचे पाच मंत्री; गच्छंतीनंतरच होणार मंत्रिमंडळ विस्तार
एटीएसने पकडलेल्या महिलेचे नाव समीरा बानो असे आहे. सुरतमध्ये राहणाऱ्या समीरा बानोचे तामिळनाडूमध्ये लग्न झाले. ती IS मॉड्यूलवर काम करायची. समीरा 16-18 वर्षांच्या मुलांना लव्ह जिहादसाठी तयार करायची. समीराही लव्ह जिहादच्या रॅकेटमध्ये सामील असल्याचे आढळून आले.
एटीएसचे डीआयजी दीपेन भद्रन यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (9 जून) ही कारवाई करण्यात आली. एटीएस काही काळ आरोपींवर लक्ष ठेवून होती आणि त्यांच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जात होती.
गेल्या महिन्याच्या सुरुवातीला एटीएसने एका मोठ्या कारवाईत अल कायदाशी संबंधित मॉड्यूलचा खुलासा केला होता. 22 मे रोजी एटीएसने अहमदाबाद येथून एका बांग्लादेशी नागरिकांना अटक केली होती, तर तिघांना ताब्यात घेतले होते. अटक करण्यात आलेले चौघे बांग्लादेशी नागरिक असून ते अहमदाबादमध्ये बेकायदेशीरपणे राहत होते आणि मुस्लिम तरुणांना अल-कायदामध्ये सामील होण्यासाठी प्रवृत्त करत होते.