मान्सून संपला, तरी पावसाचा धोका कायम; 21 राज्यांना वादळी पावसाचा इशारा

Heavy Rain Alert : मान्सूनचा हंगाम संपल्यानंतरही देशातील अनेक भागांमध्ये हवामान विभागाच्या नव्या इशाऱ्याने चिंता वाढवली आहे.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 11 01T190933.680

Heavy Rain Alert : मान्सूनचा अधिकृत हंगाम संपला असला, तरी (Rain) देशातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने 2 नोव्हेंबरसाठी महाराष्ट्रासह देशातील 21 राज्यांना पावसाचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडू शकतो, तर ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या बदलत्या हवामानामुळे उत्तर आणि पूर्व भारतातील तापमानात 7 ते 8 अंशांनी घट होण्याचा अंदाज आहे.

आग्नेय बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने पूर्वेकडील राज्यांमध्ये पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा प्रभाव जाणवू शकतो. उत्तर प्रदेशच्या आसपास पश्चिमी वाऱ्यांचा प्रभावही वाढत असल्याने हवामानातील बदल अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील डोंगराळ भागांमध्ये भूस्खलनाचा धोका असून, काही राज्यांमध्ये गारपीट होण्याचाही अंदाज आहे. जोरदार वाऱ्यांमुळे मोठी झाडे उन्मळून पडण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

एकीकडं सांगता एल निनो, पाऊस कमी अन् दुसरीकडं वारेमाफ कत्तल, भीमाशंकर प्रकल्पावरून सतेज पाटील आक्रमक

हवामान विभागाच्या अंदाजानुसार उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, झारखंड, हरियाणा, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्मीर, ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश, आसाम आणि सिक्कीम या राज्यांमध्ये 2 नोव्हेंबर रोजी पावसाची शक्यता आहे. या काळात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात मात्र पुढील काही दिवस सर्वच भागांत मुसळधार पावसाची शक्यता नाही. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये हवामान प्रामुख्याने निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. विदर्भ, दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 5 नोव्हेंबरपर्यंत राज्यातील कोणत्याही जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही. काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहू शकते, तर काही भागांमध्ये आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज आहे.

follow us